पश्चिम रेल्वेवरील काम विक्रमी वेळेत पूर्ण, पहिली एक्स्प्रेस लोअर परळहून रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 08:39 AM2019-02-03T08:39:46+5:302019-02-03T09:40:29+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक संपला आहे. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉक संपला आहे. लोअर परळ स्थानकाहून रविवारी सकाळी 7.40 वाजता अवंतिका एक्स्प्रेस रवाना झाली आहे. लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी तसेच नवे टाकण्यासाठी आणि अन्य कामांसाठी वीकेण्डच्या दिवशी 11 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. पश्चिम रेल्वेवरील गर्डरचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. 90 मिनिटांपूर्वीच डिलाईन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
धोकादायक डिलाईन पुलाचे तोडकाम शनिवारी (2 फेब्रुवारी) रात्री 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आले. या वेळी पूल तोडण्यासाठी मोठमोठ्या क्रेन मदतीसाठी आणल्या होत्या. यासाठी दादर ते चर्चगेट रेल्वेसेवा विशेष मेगाब्लॉक घेत बंद करण्यात आली होती.
अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील 455 पुलांचा सुरक्षा आढावा घेण्यात आला. लोअर परळ स्थानकाजवळील पूल (डिलाईल पूल) गंजल्याचे स्पष्ट झाल्याने आयआयटीसह रेल्वेच्या संयुक्त समितीने पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्ती काम हाती घेतले.
Mumbai: Visuals from Lower Parel Railway Station where demolition of Delisle Road Bridge was carried out last night. Western Railway CPRO says,‘Bridge had exceeded its life, we'll construct a new bridge here. We've completed dismantling work. Train services would resume soon.' pic.twitter.com/ck8WXtX0kR
— ANI (@ANI) February 3, 2019
3. Though the 11 hrs block for dismantling Delisle ROB over the tracks & clearing the debris was scheduled till 9 am on Sunday, 3rd Feb, 2019, work was completed successfully well before the target & 1st train Awantika Exp passed from 5th line at Lower Parel station at 07.40 am. pic.twitter.com/NlhhDB6t2M
— Western Railway (@WesternRly) February 3, 2019
(परेवरील 11 तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, दादर स्थानकामध्ये गर्दी)
2. WR used 5 heavy duty cranes for dismantling the Delisle ROB. Sh. A K Gupta, GM, WR reached the site & took stock of the whole work which required minute to minute meticulous planning & perfect Coordination for carrying out the work in view of only 11 hours on hand. #WRUpdatespic.twitter.com/noVNBoiz8a
— Western Railway (@WesternRly) February 3, 2019
(VIDEO : लोअर परळ स्थानकाजवळील जीर्ण पुलाचे गर्डर काढण्याच्या कामास सुरुवात)
1. WR had taken a block from 10 pm of Saturday, 2nd February to 9am of 3rd February, 2019 for dismantling the Delisle ROB over the tracks. The work has been completed before the scheduled time. #WRUpdates#SundayMotivation#SundayThoughtspic.twitter.com/dLmk056VVk
— Western Railway (@WesternRly) February 3, 2019
Maharashtra: Visuals from Mumbai's Lower Parel Railway Station that is closed for 11 hours- from 10 pm yesterday to 9 am today, due to the demolition of Delisle Road Bridge. 205 local trains and 23 long-distance trains have been cancelled for the said period. pic.twitter.com/GVnjQVUwWN
— ANI (@ANI) February 2, 2019