Join us

प्रवेश कधी होणार, आम्ही शिकविणार केव्हा सांगा? कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 2:18 PM

Education: नियमित आणि विशेष फेऱ्यानंतरही अकरावी प्रवेशापासून काही विद्यार्थी वंचित आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तरी त्यांचे शैक्षणिक सत्र कसे पूर्ण करणार, असा सवाल महाविद्यालय प्रशासनांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबई  - नियमित आणि विशेष फेऱ्यानंतरही अकरावी प्रवेशापासून काही विद्यार्थी वंचित आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तरी त्यांचे शैक्षणिक सत्र कसे पूर्ण करणार, असा सवाल महाविद्यालय प्रशासनांकडून उपस्थित करण्यात येत आहे.अर्ज केलेल्यांपैकी २७ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. तर अनेकांनी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने थेट विद्यार्थ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण न केल्याचा जाब विचारायला हवा, अशी मागणी महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून करण्यात येत आहे. निकालानंतर एक महिना प्रवेश चालू करण्यात घालवला आता असेच प्रवेश चालू झाले तर महाविद्यालयातील वर्ग कसे चालवायचे असा प्रश्न आहे. यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

धोरण आखणे आवश्यकशासनाने उशिरात उशिरा १५ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. तसे धोरण आखणे आवश्यक आहे. कदाचित यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांसारखा न्यायालयालाच हस्तक्षेप करावा लागेल अशी परिस्थिती आहे. दिवाळी, नाताळच्या सुट्ट्या, तीन ते चार परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी शैक्षणिक कामकाजाबरोबर अन्य शालेय कार्यक्रमासाठी दिवस अपुरे असतात, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मागणी केली आहे.

प्रवेश गुणवत्तेनुसार असा न्यायालयाचा आदेशकनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अकरावीचे प्रवेश गुणवत्तेनुसार व्हावेत असा न्यायालयाचा आदेश आहे. तरीही ही प्रवेश प्रक्रिया लांबवावी त्याला शिक्षण विभागाने ठोस निर्णय घेतला नाही. एवढे करूनही असंख्य विद्यार्थी- पालकांचे समाधान होत नाही. आता सप्टेंबरमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कसे शिकायला मिळणार ? प्रादेशिक भाषांतून शिक्षण घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांना अकरावीला माध्यम बदलल्यावर शिकणे अवघड जाते आणि त्यातच एवढा उशीर विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होते, असे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे प्रा. मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

टॅग्स :महाविद्यालयशिक्षण