मुंबई : मुंबईत ११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. संसर्गजन्यताही तुलनेने अधिक असणा-या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणा-या मुंबईपुढे आव्हानच होते. आहे. आता मुंबईत केवळ १० दिवसांत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल ५७ दिवसांनी वाढून १०० दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे. २० ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मुंबईने रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीचा १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता.
चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकींग-टेस्टींग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेलया कार्यवाहीमुळे मुंबई महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. २१ ऑक्टोबर रोजी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल १०२ दिवसांचा टप्पा गाठला होता. एफ-दक्षिण विभाग रूग्ण दुप्पट होण्याच्या कालावधचा २०० दिवसांचा टप्पा ओलांडणारा पहिला विभाग ठरला होता. तो लौकिक कायम ठेवत या विभागाने ३०० दिवसांचाही टप्पा ओलांडला आहे. हा विभाग आता ३६२ दिवसांवर पोहोचला आहे. बी ,जी दक्षिण, ए विभागांनीही २०० दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. बी विभाग २३२ दिवस, जी दक्षिण २३१ दिवस, ए २१२ दिवस रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे.
--------------------
कोरोना कमी होतो आहे; कारण....
- प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर- वैदयकीय उपचार विषयक आवश्यक कार्यवाही- शीघ्रकृती कार्यक्रमाची अभियान स्वरुपात अंमलबजावणी- फिरते दवाखाने- प्राथमिक तपासणी- चाचणी करुन बाधितांचा शोध- प्राणवायू पातळी तपासणे- शारीरिक तापमान तपासणे- नागरिकांना सहव्याधी असतील, त्यांची स्वतंत्र नोंद
--------------------
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी
२५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस१४ सप्टेंबर रोजी ५४ दिवस१ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस१० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस२१ ऑक्टोबर रोजी १०२ दिवस
--------------------
१० ते २१ ऑक्टोबर या १० दिवसांच्या कालावधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६९ दिवसांवरुन ३१ दिवसांनी वाढून तो १०२ दिवस इतका होता.२४ विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास २४ पैकी ३ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक होता.११ विभागांमध्ये हा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक होता.
--------------------