मुंबई बनणार मंच
By admin | Published: April 26, 2017 12:39 AM2017-04-26T00:39:09+5:302017-04-26T00:39:09+5:30
कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘मुंबई बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे.
मुंबई : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘मुंबई बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे. गोव्यासह महाराष्ट्रात महिलांच्या मनामनात राज्य करणारे लोकमत सखी मंच आणि लोकप्रिय चॅनल कलर्स परत एकदा सज्ज झाले आहे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी संच आयोजित ‘मुंबई बनेगा मंच’ या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
तुमच्या शहरातील जनता ठरविणार विजेता. तेही तुमच्या नजरेसमोर. हा कार्यक्रम २९ एप्रिल रोजी आयोजित केला असून, यात तुम्हाला येत असलेल्या अशा कलेचे प्रदर्शन तुम्हाला करायचे आहे जी कला तुम्ही मंचावर प्रस्तुत करू शकाल.
हाच कार्यक्रम महाराष्ट्रात कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘आता महाराष्ट्र बनणार मंच’, पण सादरीकरणास लागणारे साहित्य स्पर्धकांना स्वत: आणावे लागेल. ज्यात नृत्य, अभिनय, मिमिक्री, पेंटिंग, वादन, जादूचे प्रयोग, जिमनॅस्टिक, आॅर्केस्ट्रा, कवायत, योगासने, कठपुतली, मेकअप आर्ट, कीर्तन, भजन, भारूड, खंजिरी वादन, ढोल पथक इत्यादी व यांसारखे कलाप्रकार सादर करता येतील; आणि तुमच्या शहरात ‘मुंबई बनेगा मंच’ या नावाने धूम करणार आहे. तेव्हा भाग घ्या आणि जिंका भरपूर बक्षिसे.
कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नावीन्यपूर्ण शोचे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे. एका टॅलेंट शोला अशा पद्धतीने सादर करणे म्हणजे सर्व कलाकारांना आपल्या प्रतिभेला जनतेसमोर आणण्याचे प्रोत्साहन देणे होय. हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मेपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. याअंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये किंवा मॉलमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत कलाकार सामील होऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील. कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम चॅनलवर रंगणार आहे. (प्रतिनिधी)