स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुंबईच ठरणार अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:10 AM2019-01-20T00:10:41+5:302019-01-20T00:18:31+5:30
घरातील पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी नेणाऱ्या नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची विष्ठा उचलावी, याकरिता मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करून दंडवसुली करण्यात येत आहे.
मुंबई : घरातील पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी नेणाऱ्या नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची विष्ठा उचलावी, याकरिता मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करून दंडवसुली करण्यात येत आहे. उघड्यावरील प्रात:र्विधींना अटकाव केला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेºया, स्वच्छता रथ, सायकल रॅली, पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते आहे. पहाटेपासून चौक्या, तसेच इतर परिसरातील नागरिकांना स्वच्छते महत्त्व पटवून दिले जात आहे, हे सर्व मुंबई महापालिकेकडून सुरू आहे, ते केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुंबई शहराचे नाव अव्वल राहण्यासाठी.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाºया स्वच्छ सर्वेक्षणामध्ये गतवर्षी राज्याच्या राजधान्यांच्या गटात मुंबईचे नाव देशात अव्वल ठरले होते. या वर्षीही मुंबई शहराचे नाव अव्वल येण्यासाठी मुंबईकरांनी स्वच्छ भारत अभियानात अधिकाधिक संख्येने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत भारतामधील सर्व शहरांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने ३१ जानेवारीपर्यंत उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ मधील मुख्य घटक, तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने दर्जा अधिक सुधारण्यासाठी महानगरपालिकेद्वारे कार्यवाही करण्यात येत आहे.
ज्या जागी कचरा तयार होतो, त्याच जागेवर कचºयाचे सुका कचरा, ओला कचरा, याप्रमाणे विलगीकरण करणे व त्यावर प्रक्रिया करणे; यासाठी महापालिकेने विविधस्तरीय उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी व सर्व स्तरावरील अधिकारी अथक प्रयत्न करीत आहेत.
या प्रयत्नांची परिणामकारकता वाढावी, याकरिता व्यापक स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जनजागृती मोहिमेंतर्गत विविध ९४ ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाची होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर, महापालिका कार्यालये, शाळा, तसेच गृहनिर्माण संस्था या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली आहेत. शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाची भित्तीचित्रे रंगविण्यात आली आहेत. रेल्वे स्थानके, बस स्टॉप या गर्दीच्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत, तसेच जनजागृतीकरिता चित्रपटगृहांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणविषयक लघुपटदेखील जनजागृती मोहिमेंतर्गत प्रदर्शित करण्यात येत आहेत.
>पाळीव प्राण्यांची विष्ठा उचलली नाही, तर दंड
घरातील पाळीव प्राण्यांना फिरावयास नेणाºया नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची विष्ठा उचलावी, याकरिता दंडात्मक कारवाई करून दंडवसुली करण्यात येत आहे. याचा चांगला परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून, श्वानप्रेमी नागरिक आपल्या श्वानास फिरायला नेताना त्यांची विष्ठा उचलण्याची साधने सोबत ठेऊ लागली आहेत.
शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेºया, स्वच्छता रथ, सायकल रॅली, पथनाट्य यांचा यात समावेश आहे. नाताळच्या निमित्ताने महापालिका कर्मचाºयांनी सांताक्लॉजच्या वेशात येऊन बच्चे कंपनीचे मनोरंजन करण्याबरोबरच स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेशही त्या दरम्यान पोहोचविला आहे.
>स्वच्छतेचे महत्त्व पटतेय
सर्व उपायुक्त व सहायक आयुक्त पहाटेपासून चौक्या, इतर परिसरास भेट देऊन सर्वांगीण स्वच्छतेबाबत पाहणी करून स्वच्छतेचे महत्त्व सांगत आहेत.
>उघड्यावरील
प्रातर्विधींना अटकाव
महापालिकेच्या अधिकाºयांची व कर्मचाºयांची गुड मॉर्निंग पथके पहाटेपासून कर्तव्यावर उपस्थित राहून, उघड्यावरील प्रातर्विधींना अटकाव करण्यासह स्वच्छता राखण्याचे प्रयत्न करीत आहेत. नागरिकांमध्ये स्वच्छतेचे आणि ओला व सुका कचरा विलगीकरणाचे महत्त्व बिंबविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.