मुंबई दिव्यांनी उजाळणार, राजधानी ७ दिवस विद्युत रोषणाईने झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 04:01 PM2022-10-20T16:01:04+5:302022-10-20T16:01:52+5:30

मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे

Mumbai will light up with lights, 7 days will shine with electric lighting | मुंबई दिव्यांनी उजाळणार, राजधानी ७ दिवस विद्युत रोषणाईने झळकणार

मुंबई दिव्यांनी उजाळणार, राजधानी ७ दिवस विद्युत रोषणाईने झळकणार

googlenewsNext

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा अभियान राबवताना संपूर्ण मुंबई महानगर तिरंगा विद्युत रोशणाईने झळाळून निघाले होते. त्याला मिळालेला मुंबईकरांचा प्रतिसाद लक्षात घेता, दीपावली सणाच्या निमित्ताने दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर २०२२ या एका आठवड्याच्या कालावधीसाठी मुंबईतील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, वाहतूक बेटं इत्यादींवर विद्युत रोशणाई करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत करावयाच्या कामांसाठी ठिकाणे निश्चित करुन निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मागील आढावा बैठकीत दिले होते. त्याअनुषंगाने कार्यवाही किती पूर्ण झाली आहे, याची माहिती प्रारंभी महानगरपालिका आयुक्त (प्रभारी)  आश्विनी भिडे यांनी विभागनिहाय जाणून घेतली.

मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे त्याची कार्यवाही वेळेवर होईल अशा दृष्टीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन लवकरात लवकर कामे सुरु करावीत, सर्व कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड स्वरुपातील संगणकीय प्रणाली देखील माहिती तंत्रज्ञान खात्याडून उपलब्ध करुन दिली जात असून त्यामध्ये माहिती अद्ययावत करावी, असे निर्देशही भिडे यांनी दिले.

यानंतर दीपावली निमित्त मुंबई महानगरात करावयाच्या विद्युत रोशणाई कामांबाबत  भिडे यांनी सांगितले की, घरोघरी तिरंगा अभियानामध्ये मुंबई महानगरात केलेल्या विद्युत रोशणाईची मुंबईकरांनी वाखाणणी केली. नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याचा हातभारही लागला. त्याच धर्तीवर दीपावली निमित्त मुंबई महानगरातील महत्त्वाची व अधिकाधिक नागरिकांच्या दृष्टीक्षेपात असणारी सार्वजनिक स्थळं, महत्त्वाचे रस्ते, वाहतूक बेटं इत्यादी ठिकाणी विभाग कार्यालयांच्या माध्यमातून दिनांक २२ ते २९ ऑक्टोबर २०२२ या एका आठवड्याच्या कालावधीसाठी आकर्षकरित्या विद्युत रोशणाई करावी. या कामांसाठी प्रत्येक विभाग कार्यालयाला प्रासंगिक खर्च म्हणून निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे स्थळ दरपत्रिका मागवून तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्त (प्रभारी) तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी प्रशासनाला दिले.

Web Title: Mumbai will light up with lights, 7 days will shine with electric lighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.