Join us

मुंबई आता अंधारात जाणार नाही, खारघर-विक्रोळी पारेषण वाहिनी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 7:18 PM

दशकाहून अधिक काळ रखडलेल्या वीज वाहिनीच्या कार्याचे कंत्राट अदानी समूहाला २०२१ मध्ये बोलीद्वारे मिळाले.

सचिन लुंगसे  मुंबई : नव्या खारघर - विक्रोळी ट्रान्समिशन लिमिटेडमुळे मुंबईत अतिरिक्त वीज आणणे सक्षम होणार असून शहराची वाढती तसेच भविष्यातील विजेची मागणीदेखील पूर्ण करणे अधिक सुलभ होणार आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (पूर्वी अदानी ट्रान्समिशन लिमिटेड म्हणून ओळखले जाणा-या) द्वारे विकसित आणि अदाणी समुहाच्या व्यवसायातील ऊर्जा समाधान, प्रसारण आणि वितरण शाखा आदीकरिता हा प्रकल्प मुंबईच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुंबईत अलीकडच्या काळात दोनवेळा ग्रीड निकामी झाले होते. २७ फेब्रुवारी २९२२ आणि १२ ऑक्टोबर २०२० रोजी महानगरातील परिसर मोठ्या कालावधीसाठी अंधारात होता. खारघर-विक्रोळी वीज वाहिनीमुळे भविष्यात अशा कोणत्याही घटना कमी करण्यासाठी उपाय म्हणून मुंबई शहराला अतिरिक्त १,००० मेगावॅट वीज मिळेल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईसाठी तिच्या महानगरपालिका परिसरात ४०० केव्ही ग्रिड उपलब्ध होईल. यामुळे वीज ग्रीडमध्ये आयात क्षमता वाढून वीज पुरवठ्याबाबतची विश्वासार्हता आणि स्थिरता याबाबत अधिक प्रमाणात सुधार येईल. हा प्रकल्प ग्राहकांसाठी बुलेट ट्रेन, मेट्रो रेल्वे आणि शहर रेल्वे तर व्यावसायिक आणि निवासी आस्थापनांसाठी प्रवास करण्यासाठी अधिक शाश्वतता प्रदान करेल.

केव्हीटीएलमध्ये अंदाजे ७४ सर्किट किलोमीटर ४०० केव्ही आणि २२० केव्ही पारेषण वाहिनीचा समावेश आहे. तसेच विक्रोळी येथे १,५०० एमव्हीए ४०० केव्ही गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन (GIS) समाविष्ट आहे. हे मुंबईतील पहिले ४०० केव्ही उपकेंद्र आहे. अंदाजे ९,५०० चौरस मीटर क्षेत्रफळात ते व्यापले आहे. ४०० केव्ही उपकेंद्राचाबाबत ते सर्वात संक्षिप्त आरेखन आहे. त्याची अनोखी रचना ४०० केव्ही आणि २२० केव्ही जीआयसीचे अनुलंब करते. परिणामी जागेची निकड कमी भासते.

एईएसएलद्वारे वाहिनी मार्गिका टाकताना अनेक - मुख्यतः कठीण भूप्रदेश पार करताना आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र प्रगत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण वापराने त्यावर मात करण्यात आली. जसे की तरंगत्या बार्जेसवर जड रिग वापरून खाडीत सहा मनोरे बांधण्यात आले. तर शहरी भागात विशेष क्षैतिज मनो-याचा अवलंब करून काही ठिकाणी उंचीचे निर्बंध दूर केले गेले. केव्हीटीएल प्रकल्प नवी मुंबईच्या खारघर परिसरात सुरू होतो. पुढे तो त्याच्या शहरी भागातून जातो आणि मुंबई शहरातील विक्रोळी येथे संपतो. प्रकल्पात पुढील प्रमुख घटकांचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई