मुंबईत हाेणार आता डबलडेकर बोगदे; तीन जणांची समिती बोगद्यांच्या जागा ठरविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 07:12 AM2023-01-13T07:12:35+5:302023-01-13T07:12:45+5:30

एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे एमएमआरडीए क्षेत्र जोडून वाहतूककोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

Mumbai will now have double-decker tunnels; A three-member committee will decide the location of the tunnels | मुंबईत हाेणार आता डबलडेकर बोगदे; तीन जणांची समिती बोगद्यांच्या जागा ठरविणार

मुंबईत हाेणार आता डबलडेकर बोगदे; तीन जणांची समिती बोगद्यांच्या जागा ठरविणार

Next

मुंबई : वाहतूककोंडी फोडण्यासाठी परदेशात ज्याप्रमाणे डबलडेकर बोगदे तयार केले आहेत, तसे बोगदे मुंबई आणि परिसरात नेमके कोठे उभारता येतील, त्याचा अभ्यास करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गुरुवारी सरकारने नेमली. ती समिती अभ्यास करून बोगद्यांच्या जागा ठरविणार आहे.    

वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी, यासाठी मुंबईच्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यात मुंबईसाठी डबलडेकर बोगद्यांचा पर्याय अवलंबिण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि एकात्मिक वाहतूक प्रणाली यंत्रणा तयार करणाऱ्या तज्ज्ञांनी बैठक घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे एमएमआरडीए क्षेत्र जोडून वाहतूककोंडी कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईसाठी मल्टिडेक टनेल काळाची गरज असून, त्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवासन, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी तांत्रिक टीमसोबत बैठक घेऊन या एकात्मिक वाहतूक प्रणालीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत मुंबईतील वाढती वाहतूक आणि त्यावरील उपाय, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मल्टिमॉडेल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क टनेलबाबत चर्चा करण्यात आली आणि त्याचे सादरीकरण करण्यात आले.

Web Title: Mumbai will now have double-decker tunnels; A three-member committee will decide the location of the tunnels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.