मुंबई : आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबई शहराचे आयुक्तपद हे आव्हानात्मक असून सद्य:स्थितीत मुंबईकरांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर राहील. मुंबई सुरक्षित होती आणि नेहमीच सुरक्षित राहणार असे प्रतिपादन मुंबईचे नूतन आयुक्त संजय बर्वे यांनी केले. शहर, उपनगरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याबरोबरच वाढत्या आर्थिक व सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याला आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईचे आयुक्त सुबोध जायस्वाल यांची पोलीस महासंचालक व त्यांच्या जागी बर्वे यांची नियुक्ती झाल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांनी जायस्वाल यांच्याकडून पदभार स्वीकारला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मुंबई ही आपल्यासाठी नवीन नाही. येथील प्रत्येक बाबीशी आपण परिचित आहोत. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस नेहमीच दक्ष राहिले. यापुढेही अधिक सजगतेने काम केले जाईल. पाकबरोबरच्या तणावपूर्ण वातावरणामुळे सुरक्षा अधिक भक्कम ठेवण्यावर आपला भर आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी एटीएस, राज्य पोलीस दल सर्वांशी संपर्क साधून उपाययोजना राबविल्या जातील.’ मुंबईकरांनी काळजी करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद गोष्टींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असेही ते म्हणाले.कोण आहेत सुबोध जायस्वाल?च्सुबोध जायस्वाल हे मूळचे बिहारचे असून १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते होते. त्याचप्रमाणे १९९३च्या तेलगी मुंद्राक घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापलेल्या विशेष पथकाचे ते प्रमुख होते. त्यांनी या खटल्यामध्ये माजी पोलीस आयुक्त रणजीत शर्मा यांना अटक केली होती.च्न्यायालयाने मात्र त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्ता केली. जायस्वाल यांनी मुंबईत मध्य विभागाचे अतिरिक्त अप्पर आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. २६ जून २००८ पासून ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होते. त्यामध्ये रॉसह विविध तपास यंत्रणांमध्ये काम पाहिले असून त्यानंतर केंद्रीय सचिवालयात कार्यरत होते. गेल्या वर्षी ३० जूनपासून मुंबईच्या आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता.पोलीस दल भक्कम करू - जायस्वालच्देशपातळीवर महाराष्ट्र पोलीस दलाचा वेगळा लौकिक आहे. ही परंपरा साजेशी ठेवताना राज्य पोलीस दल सर्व अर्थाने अधिक भक्कम, शक्तिशाली करण्यावर आपला भर असेल, असे मनोगत राज्याचे नूतन पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी गुरुवारी व्यक्त केले. मावळते प्रमुख दत्ता पडसलगीकर यांच्याकडून त्यांनी गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पदभार स्वीकारला.च्त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्यातील प्रत्येक पोलीस घटकाशी उत्तम समन्वय ठेवून तेथील कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. शेजारील राष्ट्रासोबतच्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम केली जाईल.च्त्याबाबत वरिष्ठ अधिकारी व घटक प्रमुखांशी बोलून माहिती घेण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातील आठ महिन्यांच्या कामाबद्दल आपण समाधानी आहोत. सुरक्षा व पारदर्शी कारभाराबाबत त्या ठिकाणी राबविलेले उपाय आवश्यकतेप्रमाणे राज्यभरात राबविले जातील. पूर्वीच्या चांगल्या योजना, उपक्रम यापुढेही कायम ठेवल्या जातील.