मुंबईची हवा बिघडली; मळभ, पाऊस, प्रदूषणातही भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:06 AM2019-10-19T06:06:08+5:302019-10-19T06:06:18+5:30

संमिश्र वातावरण; अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

Mumbai winds down; Add to the dust, rain and pollution | मुंबईची हवा बिघडली; मळभ, पाऊस, प्रदूषणातही भर

मुंबईची हवा बिघडली; मळभ, पाऊस, प्रदूषणातही भर

Next

मुंबई : मुंबईकरांना शुक्रवारी अवकाळी पावसाचा प्रत्यय आला. मुंबई शहर आणि उपनगरावर दिवसभर मळभ दाटून आले असतानाच, शहरासह उपनगरात दिवसभर ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, परतलेला मान्सून आणि सुरू झालेला आॅक्टोबर हीट; अशा दुहेरी वातावरणात आता अवकाळी पाऊस, बिघडलेली हवा आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रदूषण याचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.


अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आता मुंबईसह लगतच्या किनारी प्रदेशात ठिकठिकाणी २२ आॅक्टोबरपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्याचा प्रत्यय मुंबईकरांना शुक्रवारी आला. मुंबईकरांची शुक्रवारची सकाळच ढगाळ, मळभ अशा संमिश्र वातावरणाने झाली. सकाळी मुंबईवर आलेले मळभ दुपारपर्यंत कमी होईल किंवा दूर होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र उलटे घडले. मळभ दूर होण्याऐवजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. साडेबारा ते दीड वाजेपर्यंत अवकाळी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आणि त्यानंतर विश्रांती घेतली. याच काळात मुंबईमधील दृश्यमानता होती त्यापेक्षाही आणखी कमी होत गेली. सकाळी मळभ, दुपारी पाऊस आणि त्यानंतर हवेत आलेला गारवा; अशा संमिश्र वातावरणाने मुंबईकरांचा दिवस ढवळून निघाला होता. त्यातच बिघडलेल्या हवेमुळे प्रदूषणातही भर पडत असल्याचे चित्र आहे.


मुंबई दोन दिवस राहणार ढगाळ
१९ आणि २० आॅक्टोबर : आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

वातावरणात धुळीचे कण
मान्सून परतला असताना आणि थंडी दाखल होत असतानाच, मधल्या काळात म्हणजे आॅक्टोबर हीट दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरणात धुळीच्या कणांचे प्रमाण वाढते. परिणामी, वातावरणातील दृश्यमानता कमी होते. शिवाय धुळीच्या कणांचे प्रमाण वाढल्याने प्रदूषणातही भर पडते. याचीच प्रचिती सध्या मुंबईकरांना येत आहे.
कमाल तापमानात घसरण
मुंबईचे कमाल तापमान गुरुवारी ३६ अंश सेल्सिअस होते. मात्र शुक्रवारी मुंबईत पाऊस पडला. हवेत गारवा आला. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात ६ अंशाची घसरण झाली.

राज्यासाठी अंदाज
च्१९, २० आॅक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
च् गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात सोसाट्याचा वारा वाहील.
च् नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
च्मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुरात पावसाचा अंदाज आहे.
च्विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे.
च्२१ आॅक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.

मुंबईतील शुक्रवारच्या
हवेची गुणवत्ता
धुळीच्या कणांचे प्रमाण
पार्टीक्युलेट मॅटरमध्ये
च्नवी मुंबई ३१७ अत्यंत वाईट
च्बोरीवली १७५ मध्यम
च्मालाड २१७ खराब
च्भांडुप ४५ उत्तम
च्अंधेरी १५२ मध्यम
च्बीकेसी २०९ खराब
च्चेंबूर ८० समाधानकारक
च्वरळी ७९ समाधानकारक
च्माझगाव १३ उत्तम
च्कुलाबा ५४ समाधानकारक

Web Title: Mumbai winds down; Add to the dust, rain and pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.