मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर

By सचिन लुंगसे | Published: April 15, 2024 07:39 PM2024-04-15T19:39:24+5:302024-04-15T19:40:23+5:30

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता

Mumbai with the maximum temperature dropping from 33 degrees directly to 37 degrees | मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर

मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर

मुंबई : डोक्यावर आग ओकणारा सुर्य, तापलेले रस्ते, लोकलमध्ये लागणा-या उष्णतेच्या झळा आणि ३७ अंश नोंदविण्यात आलेल्या कमाल तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांची सोमवारी अक्षरश: भटटी झाली. विशेषत: उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता. दरम्यान, मंगळवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई समुद्रसपाटीपासून किंचित खाली आहे. इराण, अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तानातून गुजरातमार्गे मुंबईत दाखल होणा-या उष्ण वा-यामुळे मुंबईमधील उष्णता वाढते आहे.
- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेशात सोमवारी उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती होती. मंगळवारीही मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ ते ३९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल.
- मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये
ठाणे ४१
कोल्हापूर ३९
सातारा ४०.१
सांगली ३९.६
जळगाव ४१.५
अहमदनगर ४०.८
छत्रपती संभाजी नगर ३९.३
बारामती ३९.१
उदगीर ३७.८
नाशिक ४०.४
पुणे ४०.८
परभणी ३९.५
मुंबई ३७.९
मालेगाव ४२.६
सोलापूर ४०.६
नांदेड ३८.६
जेऊर ४१.५
धाराशीव ३९.५

Web Title: Mumbai with the maximum temperature dropping from 33 degrees directly to 37 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.