Join us

Mumbai: पाण्यासाठी गोराईच्या महिलांनी घातला पालिकेच्या जल अधिकाऱ्यांना घेराव

By मनोहर कुंभेजकर | Published: June 15, 2023 8:35 PM

Mumbai: तब्बल गेली २१ दिवस बोरिवली पश्चिम प्रभाग क्रमांक ९ गोराई म्हाडा,आर एस सी २२ हनुमान गल्ली येथे प्लॉट २७, १०, ११, २३ व १४ येथे गेली २१ दिवस पाणी टंचाई आहे.आज पासून शाळा सुरू झाल्या.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - तब्बल गेली २१ दिवस बोरिवली पश्चिम प्रभाग क्रमांक ९ गोराई म्हाडा,आर एस सी २२ हनुमान गल्ली येथे प्लॉट २७, १०, ११, २३ व १४ येथे गेली २१ दिवस पाणी टंचाई आहे.आज पासून शाळा सुरू झाल्या. मात्र गेली २१ दिवस आमच्या घरात एक थेंब सुद्धा पाणी येत नाही असा आर मध्य विभागाच्या जल खात्याच्या अधिकाऱ्यांना सवाल करत येथील संतप्त महिलांनी माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आर मध्य विभागाच्या सहाय्यक जलाभियंता रूपा  मांडवकर यांच्या कार्यालयाबाहेर सुमारे  ठिय्या आंदोलन करून त्यांना घेराव घातला.यावेळी उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.

आजूबाजूच्या बंगलो, इमारतींना पाणी येते मात्र आमच्या घरात २१ दिवस पाणी येत नाही.जोपर्यंत पाणी कधी येणार हे येथील अधिकारी आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील महिलांनी घेतल्याची माहिती शिवानंद शेट्टी यांनी लोकमतला दिली. सुमारे ४ तास महिलांनी आंदोलन केले.कांदिवली विभागाचे जल खात्याचे कार्यकारी अभियंता आनंद सोंडे यांनी आज रात्री पाणी येईल असे आश्वासन दिले असून काम देखिल सुरू झाले असल्याची माहिती गणेश खणकर यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,येथील ३६ वर्षा पूर्वीची ६ इंचाची जलवाहिनी बदलून ९ इंचाची जलवाहिनी टाकण्यास  २१ दिवसांपूर्वी सुरवात झाली.मात्र या नव्या जलवाहिनीत दोन लिकेज आढळून आल्याने येथील पाणीपुरवठा ठप्प झाल्याचे शिवानंद शेट्टी यांनी सांगितले.आपण घटनास्थळी असून सध्या काम सुरू असून येथील नागरिक कधी पाणी येणार याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबईपाणी