गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा, ११० मुलांनी घेतला सहभाग

By मनोहर कुंभेजकर | Published: July 15, 2024 07:01 PM2024-07-15T19:01:47+5:302024-07-15T19:02:04+5:30

Mumbai News: बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखालील आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्वाखालील गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा आयोजित केली होती.

Mumbai: Workshop of cowherds to make Ganesha idol, 110 children participated | गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा, ११० मुलांनी घेतला सहभाग

गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा, ११० मुलांनी घेतला सहभाग

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखालील आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्वाखालील गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा आयोजित केली होती.

विघ्नेश आर्ट्सच्या विद्यमाने येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती घडविण्यासाठी बाल गोपाळांची कार्यशाळा जय महाराष्ट्र नगर येथील फुलपाखरू उद्यानात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला चार वर्षांपासून बारा वर्षांपर्यंतच्या मुला मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला होता. भरत घाणेकर यांनी श्रीफळ वाढवून या कार्यशाळेचे उद्घाटन केले तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य व योगेश त्रिवेदी, श्याम कदम, सेंट जॉन शाळेच्या प्रिन्सिपॉल रिना संतोष आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुमारे ११० बालगोपाळांनी या कार्यशाळेत भाग घेतला. या बालगोपाळांनी दुपारी बारा ते दोन या वेळेत उत्कृष्ट गणेशमूर्ती घडविल्या त्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रिन्सिपॉल रिना संतोष आणि वरुण घाणेकर यांचा योगेश  त्रिवेदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर जमशेदजी जिजीभॉय कला महाविद्यालयातील प्रथमेश पाटील, पूर्वा पालांडे, श्रेया गरासिया, अमोल तांबे, शीतल घाणेकर या कला शिक्षकांनी बालगोपाळांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास लक्ष्मीकांत नाईक, रमेश घाणेकर, संदेश कोलापटे, संजय घाडगे, सिद्धेश्वर वाघचौरे, नरेंद्र माली, अशोक पडीयार, हरिश्चंद्र कत्वांकर, बिपिन सावंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री नाईक, हृदया घाणेकर, रोहित गुप्ता, ओमकार कणसे, गीत घाणेकर, निशांत पेडणेकर, राहुल वाडीकर, पार्थ नगवदरिया  आदींनी परिश्रम घेतले. 

Web Title: Mumbai: Workshop of cowherds to make Ganesha idol, 110 children participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.