मुंबई: कुटुंबावर लग्नाच्या खर्चाचा भार पडू नये म्हणून एका तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना मुंबईतील सांताक्रूझमध्ये घडली आहे. २० वर्षीय तरुणीच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस तिच्या घरी गेले होते. त्यावेळी तिच्या लहान भावानं सांगितलेला घटनाक्रम पोलीस सुन्न झाले. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आई वडील करत असलेला संघर्ष तरुणी रोज पाहत होती. त्यातच पालकांनी तिच्या लग्नाची तयारी सुरू केली. आई वडिलांवर लग्नाच्या खर्चाचा भार पडू नये यासाठी तिनं जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
सांताक्रूझ पूर्वेला असलेल्या चाळीत कविता (नाव बदलण्यात आलंय) तिच्या कुटुंबासह राहायची. गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली. या घटनेचा तपास पोलीस अधिकारी प्रविण राणे आणि भारत सातपुते करत आहेत. कविताचे आई वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. तिच्या लहान भावानं कविताच्या मानसिक स्थितीबद्दलची माहिती पोलिसांना दिली. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन कविता जगत होती. मात्र कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिघडली. त्यातच लग्नाचा विषय आला. कुटुंबावर आणखी ताण येऊन नये यासाठी कवितानं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं.पोलिसाच्या प्रेमात वेडा झाला, पत्नीसह २ मुलांचा ३ वर्षांपूर्वी खून केला; मृतदेह बेसमेंटवर गाडले; अन्...
कविता दहावीत असताना तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं. कविताचे वडील रिक्षाचालक आहेत, तर आई घरकाम करते. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज काढलं. त्यामुळे कविताच्या शिक्षणासाठी हाती पैसाच उरला नाही. कविताच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी वडिलांनी कसेबसे पैसे जमवले. उधार घेतलेली रक्कम परत करता यावी म्हणून कविता एका कारखान्यात काम करू लागली. तुटपुंज्या पगारातूनही ती बचत करायची.
२०२० मध्ये कोरोनामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखी ढासळली. कविताच्या लहान भावाला ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन हवा होता. मात्र आई वडिलांकडे पैसे नव्हते. त्यामुळे साठवलेल्या पैशातून केलेली सोन्याची चेन विकण्याचा निर्णय कवितानं घेतला. मात्र आई वडिलांनी नकार दिला. कविताच्या लग्नात एखादा तरी दागिना अंगावर हा विचार त्यांच्या मनात होता. ताईच्या लग्नात आई वडिलांनी घेतलेलं कर्ज आणि त्यामुळे त्यांचे झालेले हाल कवितानं पाहिले होते. तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून कवितानं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.