मुंबईकरांनो, तुमची लोकल खासगीकरणाच्या मार्गावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:25 AM2019-10-02T06:25:13+5:302019-10-02T06:25:44+5:30

रेल्वेच्या प्रत्येक विभागात खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी खासगी सेवा पुरविण्यावर प्रशासनाचा जोर असताना, आता मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलचेही खासगीकरण होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

Mumbai, your local way on privatization! | मुंबईकरांनो, तुमची लोकल खासगीकरणाच्या मार्गावर!

मुंबईकरांनो, तुमची लोकल खासगीकरणाच्या मार्गावर!

Next

मुंबई : रेल्वेच्या प्रत्येक विभागात खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी खासगी सेवा पुरविण्यावर प्रशासनाचा जोर असताना, आता मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलचेही खासगीकरण होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. असे झाल्यास भविष्यात मुंबईकरांना खासगी तत्त्वावर चालणाºया लोकलमधून प्रवास करावा लागेल.

दिल्लीत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची नुकतीच लोकल, एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कोणत्या लोकल आणि एक्स्प्रेसचे खासगीकरण करायचे, मध्य रेल्वे मार्गावरील कोणत्या मार्गावर खासगी लोकल चालवायच्या, यावर चर्चा झाली.

मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल लवकरच दाखल होणार आहे. ती खासगी कंपनीस चालविण्यास देण्याचा विचार सध्या सुरू आहे. पर्यटनासाठी अनुकूल असलेल्या ठिकाणी लोकलचे खासगीकरण केले जाईल. ट्रान्स हार्बर मार्गावरही खासगी लोकल चालविणे सोईस्कर असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने १०० दिवसांच्या कृती आराखड्यातून जास्त महसूल देणाºया मेल, एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या कृती आराखड्यावरून तेजस एक्स्प्रेसचे खासगीकरण केले आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक्स्प्रेस, लोकलचे खासगीकरण केले जाणार आहे. त्यानुसार, भारतीय रेल्वेच्या मार्गावर खासगी तत्त्वावर गाड्या चालविण्यात येतील.

प्राथमिक स्तरावर चर्चा

दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत खासगीकरणावर प्राथमिक स्तरावर चर्चा झाली. मात्र, या बैठकीत खासगीकरणासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

रेल्वे कर्मचारी संघटनांचा विरोध
देशातील वेगवेगळ्या झोनमध्ये खासगीकरण सुरू आहे. प्रत्येक रेल्वे कर्मचारी संघटनेद्वारे खासगीकरणाला विरोध केला जात आहे. मुंबई विभागातील लोकल, एक्स्प्रेसचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला, तर रेल्वे कर्मचारी संघटनांचाही याला विरोध आहे. मुंबईतील जादा महसूल देणाºया एक्स्प्रेसचे खासगीकरण वेगात होणार आहे. प्रवाशांना दिखाऊ सुविधा देण्याच्या नावाखाली त्यांची लूट केली जाणार असल्याचा आरोप रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला.

Web Title: Mumbai, your local way on privatization!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.