मुंबईकरांनो, पावसाच्या पाण्यातून चालताय? मग सावधान... लेप्टो पसरतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 05:01 AM2018-07-10T05:01:50+5:302018-07-10T05:02:01+5:30

गेल्या तीन दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे पालिका क्षेत्रात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. शरीराला जखम झालेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आल्यास, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

 Mumbaiers, running in rain water? Then be careful ... leprosy is spreading! | मुंबईकरांनो, पावसाच्या पाण्यातून चालताय? मग सावधान... लेप्टो पसरतोय!

मुंबईकरांनो, पावसाच्या पाण्यातून चालताय? मग सावधान... लेप्टो पसरतोय!

Next

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे पालिका क्षेत्रात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. शरीराला जखम झालेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आल्यास, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे, अशी सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे.
अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते. याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या
रोगाच्या ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी आदी प्राण्यांच्या मलमूत्रातून लेप्टोचे सूक्ष्म जंतू पावसाच्या पाण्यात मिसळतात. अशा बाधीत झालेल्या पाण्याशी माणसाचा संबंध आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल, तरी अशा छोट्याशा जखमेतूनही लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी
केले आहे.

‘लेप्टोस्पायरोसिस’बद्दल
ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, त्या व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘कमी जोखीम’ या गटात मोडतात. एकदाच
पुराच्या पाण्यातून चाललेल्या, पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या ‘मध्यम
जोखीम’ या सदरात येतात. एकापेक्षा अधिक वेळा पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास, अशा व्यक्ती ‘अतिजोखीम’ या गटात मोडतात.
यामध्ये ८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गरोदर महिला यांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असते. मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.
लक्षणे
♦थंडी वाजणे
♦तीव्र डोकेदुखी
♦स्नायुदुखी
♦उलटी
♦कावीळ
♦रक्तस्राव
♦श्वासोच्छ्वासास
त्रास होणे
♦मूत्रपिंड व यकृत
निकाम्


नागरिकांनी घ्यावयाची काळजी

♦कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा
‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे
तापाकडे दुर्लक्ष न करता, त्वरित डॉक्टरांचा
सल्ला घेणे आवश्यक आहे.
♦पायावर जखम असल्यास साचलेल्या
पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा
गमबुटाचा वापर करावा.
♦साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय
साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावे.
♦साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे संसर्ग
होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक उपचार तातडीने
घेणे आवश्यक आहे.
♦ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा
सल्ला घ्या.
♦पुरेशी विश्रांती, पोषक आहार व
वेळेत उपचार घ्यावा.
♦उंदीर-घुशींचा नायनाट करावा.
♦उंदीर नियंत्रणासाठी उंदराला अन्न
मिळू न देणे, उंदराचे सापळे रचणे,
त्याला विष घालणे इ. तज्ज्ञांच्या
मार्गदर्शनानुसार वापरात आणावे.
♦घरात व आजूबाजूला कचरा
साठणार नाही, याची दक्षता
घ्यावी व कचºयाची विल्हेवाट
लावावी.

Web Title:  Mumbaiers, running in rain water? Then be careful ... leprosy is spreading!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.