Join us

मुंबईकरांनो, पावसाबाबत राहा अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 6:19 AM

सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दैना उडवली असताना अफवांच्या पुराने त्यात भर घातली आहे.

मुंबई : सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दैना उडवली असताना अफवांच्या पुराने त्यात भर घातली आहे. सोशल मीडियावरील पावसाबाबतच्या चुकीच्या पोस्टमुळे मुंबईकरांमध्ये भीती वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाबाबत सतर्क व अपडेट ठेवण्यासाठी पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर टिष्ट्वटर हॅण्डल आणि मोफत अ‍ॅपच्या माध्यमातून मुंबईकरांना यापुढे पाऊस तसेच आपत्कालीन घटनांबाबतची अधिकृत व वस्तुनिष्ठ माहिती मिळेल, अशी हमी महापालिकेने दिली आहे.बातमी सोशल मीडियावर धडकते तेव्हा तिची शहानिशा न करताच अनेक ग्रुपवर ती व्हायरल केली जाते. अनेकदा यामुळेच अफवा पसरतात. त्यांना लगाम घातला जावा, यासाठी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे ऊ्र२ं२३ी१टॅे३इटउ या टिष्ट्वटर हॅण्डलवर नियमित माहिती टाकण्यास सुरुवात झाली आहे. दर दोन तासांनी एक टिष्ट्वट करण्यात येत आहे. अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस प्रणालीवर आधारित मोबाइल फोनवर प्ले स्टोअर ऊ्र२ं२३ी१ टंल्लँीेील्ल३ टउॠट हे अ‍ॅपही उपलब्ध आहे. ते मोफत डाऊनलोड करता येईल. अ‍ॅपवर पावसाची व पावसाशी संबंधित माहिती नियमित अद्ययावत करण्यात येत आहे. शिवाय ेि.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरही नियमितपणे माहिती देण्यात येत असल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितले.>कोणती माहिती मिळणार? : पावसाळी परिस्थिती, भौगोलिक परिस्थितीची माहिती, आणीबाणी प्रसंगी संपर्क कुठे साधावा अशा विविध प्रकारची माहिती मुंबईकरांना मिळणार आहे.

टॅग्स :मुंबईपाऊस