मुंबईकर आजारी!
By admin | Published: October 2, 2015 04:07 AM2015-10-02T04:07:22+5:302015-10-02T04:07:22+5:30
सप्टेंबरमध्ये बदललेल्या वातावरणामुळे मुंबईकरांना ताप चढला होता. यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक दिसून येत होती.
मुंबई : सप्टेंबरमध्ये बदललेल्या वातावरणामुळे मुंबईकरांना ताप चढला होता. यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अधिक दिसून येत होती. पण, महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात ३,९७९ डेंग्यूचे संशियत रुग्ण आढळले आहेत. २४५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आलेत. डेंग्यूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. डेंग्यू तापाने रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी
45%
रुग्ण हे ४ ते ६ दिवस रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. साधारणत: डेंग्यूचे निदान लवकर न झाल्यास रुग्णालयात दाखल व्हावे लागते. रुग्णालयात दाखल झाल्यावर ४ ते ६ दिवसांत रुग्ण बरा होतो.
39%
रुग्ण हे १ ते २ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते, तर ज्या रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होती, असे १६ टक्केच रुग्ण ७ ते १५ दिवस रुग्णालयात दाखल असल्याची माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून मिळाली. डेंग्यूचा दुसरा बळी । कांदिवलीतील ५०वर्षीय महिलेचा २७ सप्टेंबर रोजी डेंग्यूने मृत्यू झाला. सप्टेंबरमधला डेंग्यूचा हा दुसरा बळी आहे. सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. त्याचप्रमाणे यंदाही संख्येत वाढ झाली. अनेक रुग्णांना डेंग्यूची लक्षणे आढळली. मात्र, या रुग्णांना डेंग्यू झाला नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.