Join us

मुंबईकरांचा कणा वाकला

By admin | Published: June 29, 2014 1:00 AM

कामाचे वाढते तास, संगणकासमोर बसून काम करणो, दीड ते दोन तासांचा प्रवास ही मुंबईकरांची जीवनशैली त्यांच्या पाठीचा कणा कमकुवत करत आहे.

पूजा दामले - मुंबई
कामाचे वाढते तास, संगणकासमोर बसून काम करणो, दीड ते दोन तासांचा प्रवास ही मुंबईकरांची जीवनशैली त्यांच्या पाठीचा कणा कमकुवत करत आहे. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याची काळजी घेणारेही कित्येक जण कण्याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे सुमारे 5क् टक्के मुंबईकरांना पाठीच्या दुखण्याचा त्रस कधी ना कधी जाणवत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणो आहे.
वाढत्या शहरीकरणामध्ये यंत्रचा वापरही मोठय़ा प्रमाणावर वाढलेला आहे. काही जणांना दिवसभर संगणकासमोर तर काहींना उभे राहून काम करावे लागते. दोन्ही प्रकारची कामे करणा:यांमध्ये पाठीचा 
कणा, पाठ दुखणो असे प्रकार दिसून येतात. मात्र अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. बाम, स्प्रे लावणो, औषध 
घेणो असे स्वत:च उपचार करतात. यामुळे त्यांचे पाठ दुखणो हे तात्पुरते बरे होते. मात्र पुढे हा त्रस बळावतो. यामुळेच पाठ दुखल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणो आवश्यक असल्याचे क्यूआय स्पाइन क्लिनिकच्या मुख्य स्पाईन स्पेशालिस्ट डॉ. गरिमा आनंदानी यांनी सांगितले.
जागतिक स्तरावरच्या आकडेवारीनुसार, 6क् ते 8क् टक्के लोकांना कधी ना कधी पाठीच्या दुखण्याचा त्रस होतोच. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये पाठदुखीचे प्रमाण 2क् टक्क्यांनी जास्त असते. प्रसूतीनंतर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे महिलांमध्ये पाठदुखीचे प्रमाण वाढते. प्रसूतीनंतर साधारणत: दोन ते तीन महिन्यांमध्ये महिला नोकरीला जाऊ लागतात, घरातील काम करू लागतात. प्रसूतीनंतर पाठीचे स्नायू, कणा यांना योग्य ती विश्रंती मिळणो आवश्यक असते. मात्र, असे न झाल्यास पाठदुखीचा त्रस जास्तच बळावतो. स्नायूंवरचा दबाव वाढल्यासनंतर हाडामध्ये अंतर पडते. या वेळी पाठदुखीचा त्रस जास्त वाढत जातो. कालांतराने पाय दुखायला लागतात. या वेळीही योग्य औषधोपचार न केल्यास त्या व्यक्तीची चालण्याची क्षमता कमी होते. योग्य त्या तपासण्या करून पाठदुखीचे कारण मूळ कारण शोधून औषधोपचार घेतले पाहिजेत, असे डॉ. गरिमा यांनी सांगितले.
 
च्बदलत्या जीवनशैलीमुळे पाठदुखीचा त्रस वाढत चालला आहे. महिन्याला साधारणत: 6क्क् रुग्ण आम्ही पाहतो. पाठीच्या कण्याचा आजाराचे रुग्ण आमच्याकडे येत असतात.
 
च्या 6क्क् रुग्णांपैकी 8क् ते 85 टक्के रुग्ण हे पाठदुखीचे असतात. बसण्याची पद्धत, व्यायाम न करणो यामुळे पाठदुखीचे प्रमाण वाढत चालले आहे, असे डॉ. गरिमा यांनी सांगितले. 
 
पाठीदुखी कशी टाळू शकता : एकाच स्थितीमध्ये अनेक काळ राहू नका, जीवनशैलीमध्ये बदल करा, पाठदुखीचे मूळ कारण जाणून घ्या, योग्य ते औषधोपचार करा, स्नायू बळकट करा, व्यायाम करा
 
च्अनेक तास एकाच स्थितीत बसून अथवा उभे राहून काम करणो
च्ड जीवनसत्त्वाची कमतरता
च्स्नायू बळकट नसणो
च्वाहनातून प्रवास करताना बसणारे धक्के
च्वाढते वजन
च्व्यायाम न करणो
च्ऑस्टिओपोरोसिस
च्स्लीप डिस्क 
च्महिलांमध्ये प्रसूतीनंतर पाठदुखी होते