मुंबईकर वीज ग्राहकांना दिलासा, बेस्टच्या दरात ८ टक्क्यांची कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 03:02 AM2018-09-13T03:02:26+5:302018-09-13T03:02:38+5:30

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन २०१८-२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजेचे नवीन दर जाहीर केले

Mumbaikar Power Consumers Consumers, Best Rate Cut by 8% | मुंबईकर वीज ग्राहकांना दिलासा, बेस्टच्या दरात ८ टक्क्यांची कपात

मुंबईकर वीज ग्राहकांना दिलासा, बेस्टच्या दरात ८ टक्क्यांची कपात

Next

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सन २०१८-२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजेचे नवीन दर जाहीर केले असून, हे दर १ सप्टेंबर २०१८पासून लागू झाले आहेत. नव्या दरानुसार २०१८-१९साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने मुंबईकर वीज ग्राहकांना दिलासा मिळाल्याची माहिती वीजतज्ज्ञांनी दिली. उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरच्या विजेच्या दरात ० ते १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली.
वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी याबाबत सांगितले की, मुळात आता कोणत्याच कंपनीच्या विजेच्या दरात वाढ झालेली नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीज खरेदी दर कमी झाले त्यांना वाढ करण्याची गरज भासलेली नाही. मुंबईचा विचार केला तर बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी तर अदानी इलेक्ट्रिसिटी व टाटा पॉवरच्या विजेच्या दरात ० ते १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. असे असले तरी हा दिलासा आहे, असे म्हणता येईल. कारण मुंबईकर हे भारतामधील सर्वांत जास्त दर देणारे होते. आता नव्या दरामुळे काही प्रमाणात मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, टाटा आणि अदानी या तीन वीज कंपन्या वीजपुरवठा करतात. महावितरण भांडुप आणि मुलुंड येथे वीजपुरवठा करते.
मध्यंतरी रिलायन्सने आपला वीज व्यवसाय अदानीस विकला. परिणामी, रिलायन्सची जागा आता अदानीने घेतली आहे. वीज दरांचा विचार करता नव्या दरानुसार विजेचे दर कमी होणार असल्याने बेस्ट ग्राहकांना दिलासा मिळेल. टाटा आणि अदानीसाठीची वाढ ० ते १ टक्का असल्याने त्यांना काहीशी झळ बसणार असली तरी हे प्रमाण कमी आहे.
>सन २०१७-१८ मधील सरासरी वीज दर
ग्राहक गट महावितरण अदानी टाटा पॉवर
दारिद्र्यरेषेखाली १.५४ - -
० ते १०० युनिट्स ४.८७ ४.१४ १.५५
१०१ ते ३०० युनिट्स ८.५१ ८.४३ ४.००
३०१ ते ५०० युनिट्स ११.५० ९.७९ ७.३७
५०१ ते १००० युनिट्स १३.०८ ११.६४ ९.९२
१००० युनिट्सच्या वर १४.३४ ११.६४ ९.९२

Web Title: Mumbaikar Power Consumers Consumers, Best Rate Cut by 8%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट