उष्णतेच्या झळांनी मुंबईकर लाही लाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 05:46 AM2018-03-26T05:46:31+5:302018-03-26T05:46:31+5:30
उष्णतेच्या झळांनी रविवारी मुंबई अक्षरश: होरपळली.
मुंबई/पुणे : उष्णतेच्या झळांनी रविवारी मुंबई अक्षरश: होरपळली. जगातील आठवे उष्ण शहर ठरलेल्या मुंबईत देशातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत या हंगामातील हे सर्वाधिक तापमान होते. राज्यातील इतर अनेक शहरांतील नागरिकही वाढत्या उन्हामुळे हैरण होते.
मुंबईत १७ मार्च २०११ मध्ये ४१.३ तर २६ मार्च २०१५ मध्ये ४०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्या व्यतिरिक्त एकदाही मार्च महिन्यात पाऱ्याने ३९ अंशांचा टप्पा पार केला नव्हता. मुंबईचे मार्चमधील आतापर्यंतचे सर्वाधिक ४१.७ अंश सेल्सिअस तापमान २८ मार्च १९५६ मध्ये नोंदले गेले आहे.
विदर्भातील बहुतांश भागाचा पारा रविवारी चढला. विदर्भात २ ते ३ तर कोकणात ३ ते ६ अंश सेल्सिअसने
तापमान वाढले. अकोला जगातील चौदावे उष्ण शहर ठरले. तेथे ४०.५ अंशाची नोंद झाली.
प्रमुख शहरांचे तापमान
(अंश सेल्सिअस) : मुंबई ४१, भिरा ४१, अकोला ४०.५, सोलापूर ४०़२, ब्रह्मपुरी ४०़१, परभणी ४०, चंद्रपूर ३९़६, वर्धा ३९़५, नांदेड ३९़५, उस्मानाबाद ३९़१, गोंदिया ३९, नागपूर ३९, यवतमाळ
३८़५, अमरावती ३८़४, सांगली ३८़४, अहमदनगर ३८, सातारा ३७़५, औरंगाबाद ३७़३, नाशिक ३७़३, कोल्हापूर ३७़३, बुलडाणा ३७़२़, पुणे ३७, रत्नागिरी ३५़९, डहाणू ३५़१, अलिबाग ३४़७,
महाबळेश्वर ३२़६.
पूर्वेकडून मुंबईसह महाराष्ट्राकडे वाहत असलेल्या उष्ण वाºयामुळे तापमान
वाढले आहे. कमाल तापमानात पाच ते सहा अंशांची वाढ होईल, असा अंदाज शनिवारीच वर्तविण्यात आला होता.
२४ तासांसाठी उष्णतेच्या लाटांचा इशारा कायम आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई हवामान विभाग