Join us

मुंबईकर विद्यार्थ्यांना आवडू लागले इंग्रजी, उत्तीर्णांचे प्रमाण यंदा ५.५ टक्क्यांनी वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 3:19 AM

संस्कृत, हिंदी या विषयांमध्येही मुंबईकर विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून आली.

मुंबई : बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण यंदा ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यातही मुंबईकर विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी इंग्रजीचा आधार मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील वर्षी इंग्रजी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८७.८१ होती, यंदा मात्र ती थेट ९०.७५ एवढी झाली आहे. म्हणजेच इंग्रजी विषयात उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या २.९४ टक्क्यांनी वाढली आहे.

इतर विषयांप्रमाणे मराठी विषयातही उत्तीर्णांची संख्या वाढली असली तरी त्यात ०.९२ टक्के एवढीच वाढ दिसत आहे. मागील वर्षी मराठीत ९७.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ९८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्कृत, हिंदी या विषयांमध्येही मुंबईकर विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या परीक्षेत १५४ विषयांपैकी तब्बल २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये मल्ल्यालम, तेलगू, पंजाबी, जापनिज, एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, ड्रॉइंग, मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयांचा समावेश आहे.मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का मुलांपेक्षा४.९७ ने जास्तमुंबईचा निकाल ८९.३५ टक्के लागला असून या परीक्षेत ९१.९७ टक्के मुली, तर ८७ टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे मुंबईच्या निकालात पुन्हा एकदा मुलीच वरचढ ठरल्या. मुंबई विभागातून एकूण १,४८,३३९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यामध्ये १,३६,४२३ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण मुलांमध्ये १,६४,९५२ मुले परीक्षेला बसली होती, त्यापैकी १,४३,५०८ मुले उत्तीर्ण झाली.90%+ १,१०९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुणगतवर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. राज्यात ७ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, त्यात मुंबईतील ३,१०९ विद्यार्थी आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार८७४ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे,तर मुंबईतही ८९९ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

 

टॅग्स :बारावी निकालविद्यार्थी