मुंबईकरांनी खरेदीचा ‘मुहूर्त’ साधला, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसह घरांचीही बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 03:49 AM2018-04-19T03:49:13+5:302018-04-19T03:49:13+5:30

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असला, तरीही बुधवारी राज्याच्या सराफा बाजाराने तब्बल ४२५ कोटी रुपयांची उलाढाल केल्याची नोंद केली आहे.

Mumbaikar took the 'Muhurat' purchase, Akshaya Tritiya also bought gold with the purchase of gold | मुंबईकरांनी खरेदीचा ‘मुहूर्त’ साधला, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसह घरांचीही बुकिंग

मुंबईकरांनी खरेदीचा ‘मुहूर्त’ साधला, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीसह घरांचीही बुकिंग

Next

मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराने उच्चांक गाठला असला, तरीही बुधवारी राज्याच्या सराफा बाजाराने तब्बल ४२५ कोटी
रुपयांची उलाढाल केल्याची नोंद केली आहे. दुसरीकडे घरांच्या किमती स्थिर असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांनी गृह खरेदीचा, तर विकासकांनी नव्या प्रकल्पांच्या भूमिपूजनाचा मुहूर्त साधला. त्यामुळे खऱ्या अर्थाने
ज्वेलरी आणि गृहनिर्माण क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा बाजारात रंगली होती.
मुंबईसह राज्यभर सोने खरेदीला ग्राहकांनी पसंती दिल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे
प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली. ते म्हणाले, तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या सर्वार्थ सिद्धी महायोगाचा लाभ घेण्यासाठी दराची पर्वा न करता ग्राहकांनी सोन्याची नाणी,
साखळ्या, अंगठ्या अशा छोट्या दागिन्यांसह मोठ्या दागिन्यांचीही खरेदी केली. पुढील दोन महिने लग्नसराईचा काळ असल्याने लग्नसमारंभात लागणाºया दागिन्यांची बुकिंगही या वेळी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात हिरे व्यवसायात गुंतवणूक करणारा वर्गही बुधवारी सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसला. परिणामी, प्रतितोळा ३२ हजार रुपयांवर गेलेला सोन्याचा दर आणखी काही काळ चढाच राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई शहरातील घरांच्या किमती यापुढेही चढ्याच असतील, अशी माहिती विकासक डॉ. सुरेश हावरे यांनी त्यांच्या नव्या प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी दिली. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विक्रोळी येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ते म्हणाले, रेडी रेकनरचे दर बाजार किमतीएवढेच आहेत. म्हणूनच आहे त्या किमतीत चांगल्या दर्जाची घरे उभारण्याचे आव्हान विकासकांसमोर आहे. म्हणूनच अधिकाधिक अत्याधुनिक सेवा पुरविण्याचे काम विकासकांना करावे लागेल.

दरवाढीचा परिणाम नाही
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर अधिक असतानाही दरवाढीचा परिणाम जाणवला नाही सोने विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे एका ज्वेलर्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक टी.एस. कल्याणरामन् यांनी सांगितले.
ते म्हणाले, अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी आणि आगामी लग्नसमारंभासाठी ग्राहकांनी मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहून आश्चर्य वाटले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बहुतेक ज्वेलर्सने ‘मेकिंग चार्जेस फ्री’, ‘ज्वेलरी खरेदीवर लकी ड्रॉद्वारे गाडी किंवा सोन्याची नाणी जिंका’ अशा वेगवेगळ्या आॅफर्सही ठेवल्या होत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसला.


सोन्याच्या दरात झालेल्या वाढीनंतरही गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्के अधिक वाढ झाली आहे. गतवर्षी ३५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल केलेल्या बाजाराने यंदा राज्यात ४२५ कोटींपर्यंत झेप घेतली. बुधवारी सकाळपासून मुंबईकरांनी मोठ्या प्रमामात सोने खरेदीसाठी गर्दी केली केली होती. याउलट इतर राज्यांत दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद या ठिकाणी ग्राहकांनी सायंकाळनंतर गर्दी केली. लग्नसराईचे दागिने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घेऊन जाणाºया ग्राहकांची संख्या अधिक होती. तर गुंतवणूकदारांनी सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दिली.
- कुमार जैन, प्रवक्ते - मुंबई ज्वेलर्स असोसिएशन

Web Title: Mumbaikar took the 'Muhurat' purchase, Akshaya Tritiya also bought gold with the purchase of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं