Join us  

मुंबईकर ‘व्होट’ कर; सोशल मीडियावरून आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 4:31 AM

मत वाया घालवू नका : निवडणूक आयोगासह जागरुक मुंबईकरांचीही मोेहीम

मुंबई : सुरक्षा, दुष्काळ, पायाभूत सेवा-सुविधा, वाहतूक व्यवस्थेसह अनेक मुद्द्यांमध्ये त्रुटी आढळत असल्याने साहजिकच नागरिकांकडून लोकप्रतिनिधींवर आगपाखड केली जाते. परिणामी अशा मुद्द्यांना हात घालणारे लोकप्रतिनिधी संसदेत असावेत; त्यांनी या मुद्द्यांना न्याय द्यावा, म्हणून नागरिक आग्रही असतात. नेमके हेच मुद्दे डोळ्यासमोर ठेवत उर्वरित घटकांना प्राधान्य देत अशा लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी मुंबईकरांनी आपले मत वाया घालवू नये तर मतदान करावे, अशा आशयाच्या मजकुरांनी सोशल मीडिया ओव्हर फ्लो झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार, २९ एप्रिलला मुंबईत मतदान होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाकडून मतदार जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. विशेषत: आयोगाने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला आहे. नवमतदारापासून ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे; म्हणून नवनव्या युक्त्या अवलंबिल्या जात आहेत.निवडणूक आयोगाव्यतिरिक्त सोसायटी, हॉटेल्स आणि विविध स्तरांतून मतदान करण्यासाठीचे आवाहन केले जात आहे. या व्यतिरिक्त जागृत मुंबईकरांनीही सोशल मीडियावर अभियान चालविले असून, याद्वारे आपले मत वाया घालवू नका, असे आवाहन केले जात आहे.

‘कर्तव्य बजावणे गरजेचे’मतदानाच्या दिवशी जोडून सुट्ट्या आल्या असल्या तरी मतदानाचे कर्तव्य बजावून लोकशाही समृद्ध करणाऱ्या राष्ट्रीय महोत्सवात सुजाण नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे, असे आवाहन फेसबुक, टष्ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवरून नेटीझन्स करत आहेत

विनोदी मेसेजही व्हायरल‘लग्न झालेल्या माझ्या सर्व मित्रांनो, तुमच्या मताला घरात किंमत नसली तरी देशाला आहे. कृपया मतदान करा,’ असे काही विनोदी, पण मतदानासाठी आवाहन करणारे मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल तसेच फॉरवर्ड होत असल्याचे पाहायला मिळाले.

‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’उपक्रमनवमतदारांसाठी ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा नवमतदारांसाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुंबई जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी सांगितले. सोमवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल. युवा मतदाराने मतदान केल्यानंतर, केद्रांच्या विहीत १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येऊन सेल्फी काढून तो firstvoteselfie@gmail.com या ई-मेल अथवा ९३७२८३००७१/९३७२८३००७१य्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचा आहे.

रेल्वे प्रशासनानेही घेतला पुढाकारप्रत्येक मतदात्याने मत करण्याचे आवाहन गर्दीच्या रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना करण्यात येत आहे. सुट्टी मिळाल्याने मतदारांनी बाहेरगावी जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन लोकमान्य टिळक टर्मिनस, सीएसएमटी, दादर, ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरीवली, कल्याण आदी स्थानकांवरून उद्घोषणेद्वारे करण्यात येत आहे. नुकतीच सीएसएमटी, चर्चगेट स्थानकावर ‘फ्लॅश मॉब’द्वारे नवमतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांची एक्स्प्रेस वेवर मतदान जागृतीआयआयटीचे विद्यार्थी शनिवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एक्स्प्रेस वे वरून शहराच्या बाहेर जाणाºया प्रवाशांना सोमवारी मतदानासाठी पुन्हा शहरात या, अशी विनंती करत होते. बॅलेट बुलेटपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे, मुंबई रेडी टू व्होट असे संदेश असणारे फलक हातात घेऊन हे तरुण तीन तास मतदान जागृती करत होते. मुलुंड टोल नाक्यावर ही मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचा मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती गिरीराज बगला या आयआयटीच्या विद्यार्थ्याने दिली.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमतदान