corona virus : मुंबईकर जिंकतोय कोरोनाविरुद्धची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 09:57 AM2020-10-22T09:57:00+5:302020-10-22T09:57:41+5:30

कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आणणे आणि यासाठी शीघ्रकृती कार्यक्रमाची कणखरपणे व अभियान स्वरूपात अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे.

Mumbaikar is winning the battle against Corona | corona virus : मुंबईकर जिंकतोय कोरोनाविरुद्धची लढाई

corona virus : मुंबईकर जिंकतोय कोरोनाविरुद्धची लढाई

googlenewsNext


मुंबई :मुंबईत ११ मार्च २०२० रोजी कोविडचा पहिला रुग्ण आढळून आला होता. संसर्गजन्यताही तुलनेने अधिक असणाऱ्या आजाराला प्रतिबंध करणे, हे लोकसंख्येची घनता अधिक असणाऱ्या मुंबईपुढे आव्हानच होते. आहे. तथापि, या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देतानाच वैद्यकीय उपचारविषयक आवश्यक कार्यवाही केली जात आहे. परिणामी कोरोना संसर्गास परिणामकारकरीत्या आळा घालणे शक्य होत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे.

कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आणणे आणि यासाठी शीघ्रकृती कार्यक्रमाची कणखरपणे व अभियान स्वरूपात अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. ज्या भागांमधील रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असेल, त्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रामुख्याने फिरते दवाखाने विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणी व चाचणी करून बाधितांचा शोध घेत आहेत. गरज असणाऱ्या भागांमध्ये २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

संसर्गजन्य आजाराला प्रतिबंध करण्यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आरोग्य शिक्षण देणे आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्याच्या १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणादरम्यान कुटुंबातील सदस्यांची प्राणवायू पातळी व शारीरिक तापमान तपासण्याचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाच्या स्तरावर आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना सहव्याधी असतील, त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे, तर ज्या नागरिकांना कोविडची लक्षणे असतील, त्यांना महापालिकेच्या दवाखान्यात अथवा रुग्णालयात पुढील आवश्यक त्या तपासणीसाठी पाठविले जात आहे.

चेज द वायरस आणि ट्रेसिंग – ट्रॅकिंग – टेस्टिंग – ट्रिटिंगची चतु:सूत्री
- बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तींचे अलगीकरण करणे
- आवश्यकतेनुरूप संशयितांच्या व बाधितांच्या कोरोनाविषयक वैद्यकीय चाचण्या करणे
- लक्षणे असलेल्या बाधितांवर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार औषधोपचार करणे यासारख्या बाबींचा समावेश
- वैद्यकीय चाचण्या करताना त्याबाबतचा अहवाल २४ तासांच्या आत महापालिकेकडे प्राप्त होईल
- त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार अधिकाधिक प्रभावी कार्यवाही करण्यात येते
- कार्यवाहीमुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा प्रभावीपणे शोध घेऊन त्यांचे विलगीकरण व औषधोपचार करण्याची कार्यवाही

- सार्वजनिक परिसरात जे नागरिक विनामास्क आढळून येतील त्यांच्यावर महापालिकेच्या पथकांद्वारे दंडात्मक कारवाई नियमित केली जात आहे.
- ही कारवाई आवश्यक तेथे मुंबई पोलिसांच्या सहकार्यानेही नियमित केली जात आहे.
- यामुळेही कोविड संसर्गास आळा घालणे महापालिकेला शक्य होत आहे.
- संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण दिवसातून अनेकदा करण्यात येत आहे.
- सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर आदी उपलब्ध असतील याकडेही लक्ष पुरविण्यात येत आहे.

Web Title: Mumbaikar is winning the battle against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.