Join us

मुंबईकर तरुणांनी शोधली सरड्याची नवी प्रजात, सॅन थ्रोटेड लिझार्ड ही सरड्याची १२वी प्रजात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 5:45 AM

मुंबईकर मयुरेश आंबेकर आणि झिशान मिर्झा या तरुणांनी केरळमध्ये ‘सॅन थ्रोटेड लिझार्ड’ (रंगीबेरंगी मान असलेला सरडा) शोधला आहे. प्राण्यांसंबंधीच्या संशोधनाचे संकलन करणाºया आणि प्रकाशित करणा-या ‘झू टॅक्सा’ या आंतरराष्टÑीय दैनिकाने या संशोधनाची दखल घेतली आहे.

मुंबई : मुंबईकर मयुरेश आंबेकर आणि झिशान मिर्झा या तरुणांनी केरळमध्ये ‘सॅन थ्रोटेड लिझार्ड’ (रंगीबेरंगी मान असलेला सरडा) शोधला आहे. प्राण्यांसंबंधीच्या संशोधनाचे संकलन करणाºया आणि प्रकाशित करणा-या ‘झू टॅक्सा’ या आंतरराष्टÑीय दैनिकाने या संशोधनाची दखल घेतली आहे. आंबेकर आणि मिर्झा यांनी या सरड्याच्या प्रजातीवरील संशोधन, त्याचे वर्गीकरण, त्याच्या डीएनएचा अभ्यास पूर्ण केला आहे.कलेश सदाशिवन, मोहम्मद पलोट आणि रमेश एम. या तीन प्राणिशास्त्र अभ्यासकांना केरळमधील पुवारा या गावात हा सरडा सापडला. त्यानंतर, त्यांनी बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसशी (एनसीबीएस) संपर्क साधला. येथील वन्यजीव जीवशास्त्र विषयातील संशोधक झिशान मिर्झा (रिसर्चर) आणि मयुरेश आंबेकर (रिसर्चर इंटर्न) यांच्या ताब्यात सरडा देण्यात आला. त्यानंतर मयुरेश आणि झिशान यांनी या सरड्यावर संशोधन केले.मयुरेश आणि झिशानने केलेल्या संशोधनानुसार, सॅन थ्रोटेड लिझार्ड ही सरड्याची १२वी प्रजात आहे. या प्रजातीचे सरडे फक्त केरळमधील पुवारा परिसरातच आढळतात, असा दावाही आंबेकर यांनी केला आहे. ‘सिताना अ‍ॅटनबोरगी’ (२्र३ंल्लं ं३३ील्लुङ्म१ङ्म्रॅँ्र) असे या सरड्याला वैज्ञानिक भाषेत नाव देण्यात आले आहे. या सरड्याची मान निळ्या आणि केशरी रंगाची आहे.संवर्धन आवश्यकसिताना अ‍ॅटनबोरगी या प्रजातीचा सरडा फक्त भारतातच आढळतो, असा दावा आंबेकर यांनी केला आहे. भारतातही फक्त पुवारा परिसरात आढळत असल्यामुळे, या ठिकाणी या सरड्याचे संवर्धन व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले, तसेच या सरड्याविषयी राष्टÑीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राण्यांविषयी संशोधन करणाºया संस्था आणि माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामुळे संबधित वृत्त वाचल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या सरड्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत आंबेकर यांनी मांडले.

टॅग्स :मुंबईविज्ञान