मुंबईकरांना ताप, गॅस्ट्रोची दृष्ट

By admin | Published: June 22, 2014 01:06 AM2014-06-22T01:06:49+5:302014-06-22T01:06:49+5:30

मुंबईकर चातकाप्रमाणो पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत मुंबईवर मळभ दाटून आले तरी पाऊस हुलकावणी देत आहे.

Mumbaikaran fever, gastro sight | मुंबईकरांना ताप, गॅस्ट्रोची दृष्ट

मुंबईकरांना ताप, गॅस्ट्रोची दृष्ट

Next
>मुंबई : मुंबईकर चातकाप्रमाणो पावसाची वाट पाहत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत मुंबईवर मळभ दाटून आले तरी पाऊस हुलकावणी देत आहे. उकाडा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम म्हणजे मुंबईच्या दवाखान्यांमध्ये ताप, गॅस्ट्रो आणि घशाच्या संसर्गाच्या रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. 
जूनच्या पहिल्या आठवडय़ाच्या तुलनेत तापमानाचा पारा उतरलेला असला तरीही मुंबईकरांना पावसाचा थंडावा अनुभवता आलेला नाही. एकूण या बदलत्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसतो. पावसाला सुरुवात झाली नसली तरी तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. हा ताप साधाच असला तरीही जास्त प्रमाणात येतो. पोटदुखीचे रुग्णही गेल्या आठवडय़ापासून पाहायला मिळत आहेत. सध्याच्या वातारणामुळे जंतुसंसर्गाच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाणो टाळा, असे फोर्टिस रुग्णालयातील फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी सांगितले.
पावसाला अजून सुरुवात झाली नसल्याने बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ले जातात. यामुळेच पोटदुखी, अतिसार, गॅस्ट्रो असे आजार मुंबईकरांना होत आहेत. घशाच्या संसर्गाचे रुग्णही पाहायला मिळत आहेत. खोकला आणि ताप याचे प्रमाणदेखील वाढताना दिसते. पावसाला सुरुवात व्हायची आहे, मात्र गेल्या आठवडय़ात माङयाकडे काही डेंग्यूचे रुग्णही आले होते. पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांच्या प्रमाणात वाढ होते. यामुळे सगळ्यांनीच आतापासून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जास्त तणावाखाली राहिल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे साथीच्या आजाराची लागण होऊ शकते. यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घ्या, असा सल्ला फिजिशियन डॉ. शैलजा सिंग यांनी दिला आहे.
उलटय़ा आणि गॅस्ट्रोच्या बरोबरीने तापाचे रुग्ण रोज दवाखान्यांमध्ये येत आहेत. दोन-तीन दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होईल. यानंतर साथीच्या आजारांचे रुग्ण वाढायला लागतील. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली नसली तरी मुंबईकर आजारी पडायला लागले आहेत. हे आजार विविध अवयवांवर परिणाम करतात. मधुमेह आणि रक्तदाब असलेल्यांना याचा जास्त त्रस होतो. यामुळेच मधुमेह असणा:यांनी साखर स्थिर राहील, याची काळजी घेणो अत्यंत गरजेचे आहे. रक्तदाब ही वाढू देऊ नका आणि ताणाखाली राहू नका. पावसाळ्यात आजारी पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या, असे फिजिशियन डॉ. कृष्णकांत ढेबरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Mumbaikaran fever, gastro sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.