Join us

मुंबईकरांनो! बसमध्ये मोबाईल वापरला तर गुन्हा दाखल होणार; बेस्टने काढला 'नियम'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 11:09 PM

अनेकजण सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठमोठ्याने बोलतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात.

अनेकजण सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठमोठ्याने बोलतात किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवतात. यामुळे बेस्टने अशा प्रवाशांना सक्त ताकीद देत बेस्टमध्ये स्मार्टफोन वापरण्यास मनाई केली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

उपक्रमाच्या बसगाडयांमधून प्रवास करणा-या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल असतात व त्याचा वापर मुक्तपणे करण्यात येतो. अनेक प्रवासी जोरजोरात मोबाईलवर बोलत असतात. तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकत बघत असतात. आवाजाची पातळी जास्त असल्यामुळे बसगाडीमधील अन्य प्रवाशांना त्याचा त्रास होतो, असे यामध्ये म्हटले आहे. 

बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा ही सार्वजनिक परिवहन सेवा असून बसगाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होवू नये. याकरीता मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत (कलम ३८ / ११२) सदर प्रवाशावर कारवाई होवू शकते. यामुळे बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये 'इयरफोन शिवाय मोबाईलवर ऑडिओ / व्हीडीओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठया आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे य़ा आदेशात म्हटले आहे.  

टॅग्स :बेस्टमुंबई