लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांत अशा नंबर प्लेटचे प्रमाण कमी झाले असले तरी फॅन्सी नंबर घेण्याकडे वाहनधारकांचा ओढा आजही कायम आहे. मुंबईकर या फॅन्सी नंबरप्लेटसाठी हजारो रुपये मोजत आहेत. त्यात १ नंबर मुंबईकरांचा आवडीचा असून, त्यासाठी ते ४ लाख ते १२ लाख खर्च करत आहेत.
प्रत्येकाला आपल्या आवडीचा नंबर हवा असतो. काही जण तर त्यासाठी वेगळे पैसे मोजायला तयार असतात. आरटीओ कार्यालयातून फॅन्सी नंबर घेण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली असते. एकाच नंबरसाठी अनेकदा जास्त अर्ज येतात. अशावेळी नंबरचा लिलाव केला जातो. लाखो रुपये मोजून नंबर घेतला जात आहे. त्यात आता वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे पसंती नंबरसाठी चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांची विविध नंबरला पसंती
वाहनधारकांचा ९, ९९, ९९९, ९९९९, ७८६, ८०५५ अशा विविध नंबरकडेही ओढा दिसतो. अनेक जण जन्म तारीख, आपल्या पूर्वीच्या वाहनाचा क्रमांक घेण्यासही प्राधान्य देतात. सर्वसामान्य वाहनधारकांकडून १५ ते ५० हजारांदरम्यान शुल्क असलेला नंबर घेण्यास प्राधान्य दिले जाते.
सर्वाधिक दर
पसंती क्रमांक -चारचाकी -दुचाकी
०००१ - ४ लाख -५० हजार
९०,०९९,०७८- १.५ लाख - २० हजार
०१११,०२२२,०३३३- ७० हजार -१५ हजार
०००२,०००३,०००४- ५० हजार - १० हजार
वाहनचालक पसंतीच्या नंबरसाठी अर्ज करतात. काही ठराविक नंबरकडे वाहनचालकांचा अधिक कल पाहायला मिळतो. वाहन चालकाला चारचाकी वाहनचालकांना हवा असलेला एखादा नंबर उपलब्ध नसेल आणि तो इतर कोणत्याही सिरीजमध्ये उपलब्ध असेल तिप्पट शुल्क भरावे लागते. चारचाकीचा सर्वाधिक दर ४ लाख आहे, पण तो क्रमांक उपलब्ध नसेल आणि दुचाकी सिरीजमध्ये असेल तर १२ लाख रुपये मोजावे लागतात.
अशोक पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी