मुंबईकरांचे पुढील स्थानक चुकतेय, लोकलमधील उद्घोषणा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:43 PM2023-08-30T12:43:36+5:302023-08-30T12:43:48+5:30

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज तीन हजारांपेक्षा जास्त लोकल फेऱ्यातून साधरणतः ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

Mumbaikars are missing their next station, local announcements are off | मुंबईकरांचे पुढील स्थानक चुकतेय, लोकलमधील उद्घोषणा बंद 

मुंबईकरांचे पुढील स्थानक चुकतेय, लोकलमधील उद्घोषणा बंद 

googlenewsNext

मुंबई : पुढील स्थानक कोणते? ते कोणत्या दिशेला येणार? याबाबत लोकलमध्येच माहिती देणारे इंडिकेटर असलेल्या बंबार्डिअर लोकलचा मुंबई रेल्वे ताफ्यात समावेश करण्यात आला. मात्र, सद्यस्थितीत अनेक लोकलमधील इंडिकेटर सुस्थितीत नसल्याने ही सुविधा प्रवाशांसाठी असुविधा ठरत आहे. लोकलच्या इंडिकेटरमध्ये चुकीचे स्थानक दाखविले जाते तर कुठे बंद आहे. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत असून इंडिकेटरद्वारे उद्घोषणा होत नसल्याने अनेकांचे पुढील स्थानक चुकत आहे.

मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज तीन हजारांपेक्षा जास्त लोकल फेऱ्यातून साधरणतः ७५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. दररोज मुंबईकरांना लोकल प्रवासात कधी गर्दीचा सामना तर, कधी तांत्रिक बिघाडाचा फटका बसतो. गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील इंडिकेटरमध्ये चुकीचे स्थानक दर्शवित असल्याचे प्रकार वाढले आहेत. याशिवाय लोकलमध्ये इंडिकेटर बंद असल्याने प्रवास करताना प्रवाशांची तारांबळ उडते. तर काही वेळा लोकल सुटल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. 

गोंधळामुळे प्रवासी मारतात उड्या
चुकीच्या उद्घोषणा, इंडिकेटरवर चुकीचे स्थानक आणि लोकल दाखवत असल्याने अनेकदा प्रवाशांमध्ये गोंधळ उडतोय. या गोधळात स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवासी धावत्या ट्रेनमधून उड्या मारतात. रेल्वेने इंडिकेटरची नियमित देखभाल, दुरुस्ती करायला हवी. 

स्थानक आणि लोकलमध्ये इंडिकेटर दर्शविणारे लोकल, उद्घोषणा चुकीच्या होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. आम्ही तक्रारी केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत हे प्रकार थांबलेले नाहीत. - सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे यात्री परिषद

Web Title: Mumbaikars are missing their next station, local announcements are off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.