Join us

मुंबईतल्या सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:06 AM

मुंबईतल्या सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचे अभियानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतल्या सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचे ‘मुंबई आमची-सामान्य माणसांची’ हे अभियान ...

मुंबईतल्या सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचे अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतल्या सामान्य माणसांसाठी मुंबईकरांचे ‘मुंबई आमची-सामान्य माणसांची’ हे अभियान मुंबईतील २२७ वॉर्डांत राबविले जात आहे. ज्यात २४ महानगर पालिकाच्या गेटवर मोठी पारदर्शक तक्रार पेटी ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.

सर्वात मोठे बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेची स्थापना १८८८ साली झाली. मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वा कोटी असून, २२७ नगरसेवक, २४ प्रशासकीय वॉर्ड आहेत, ज्याचे बजेट सुमारे ४० हजार कोटी आहे, पण वास्तव मात्र वेगळे आहे. कारण मुंबईकरांची आजही सर्व बाबतीत यातायात होत आहे आणि ती होऊ नये म्हणून मुंबईतील मुंबईकर ‘मुंबई आमची - सामान्य माणसांची’ या अभियानअंतर्गत एकत्र येत आहेत. मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि अधिकारांसाठी प्रत्येक मुंबईकराला जागरूक करून लोकसहभागातून संघर्ष करण्यास प्रवृत्त करणे. त्याचबरोबर मुंबई ही जितकी उच्चभ्रू श्रीमंतांची आहे, तितकीच ती सामान्य माणसांचीसुद्धा आहे याची जाणीव करून देणे. त्यातून मुंबईचे शासन - प्रशासन सामान्य माणसांसाठी दक्षपणे, सक्षमपणे आणि जबाबदारीने कार्यरत करणे हे या अभिनयाचे मुख्य ध्येय आहे.

विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास, अमोल मडामे, प्रभा तीरमरे, अविनाश पाटील, वत्सला शुक्ला, दीपक सोनवणे, किरण सोलंकी, सुनील चौव्हाण, बिलाल खान, फहाद अहमद, संदेश लाळगे, किरण सोलंकी, खुशबू खान, आशा पुजारी, सुशील शिंदे, प्रमोद शिंदे, देवेंद्र ठाकूर, जॉनसन्स एबंझेर, अगस्तीन बेंजामिन, भानुप्रीया नाडर, प्रवीण दाभाडे, मुबारक शेख, अरिश, चाऊस शेख, वीरेंद्र दिवांर, निनाद पाटील, पंकज दळवी, किरण कदम, रमेश कदम, प्रतीक कांबळे, राजेश मोरे, अमोल निकाळजे, संतोष शिंदे, जमीला शेख, नागेश सुर्वे, प्रोे. जालंदर अडसुले, योगिनी पगारे असे अनेक कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले असून, मुंबईकरांनाही या अभियानात सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे.