मुंबईकरांवर ऐन सणात कोसळला दु:खाचा डोंगर; रेल्वेच्या निष्काळजीपणाचे २२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 04:33 AM2017-09-30T04:33:03+5:302017-09-30T04:33:23+5:30

कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली.

Mumbaikars collapsed in the muddy hills; 22 victims of negligence of the Railways | मुंबईकरांवर ऐन सणात कोसळला दु:खाचा डोंगर; रेल्वेच्या निष्काळजीपणाचे २२ बळी

मुंबईकरांवर ऐन सणात कोसळला दु:खाचा डोंगर; रेल्वेच्या निष्काळजीपणाचे २२ बळी

googlenewsNext

मुंबई : कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली.
एलफिन्स्टन रोड स्थानकावर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन ८ महिला आणि एका लहान मुलासह तब्बल २२ जणांचा त्यात बळी गेला, तर ३९ प्रवासी जखमी झाले. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना आहे. देशभरात नवरात्रीचा उत्साह संचारलेला असताना दसºयाच्या तोंडावर मुंबईकरांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबईच्या इतिहासात आणखी एका ‘ब्लॅक फ्राय डे’ची नोंद झाली.
पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोडवरील पुलावर नेहमीच गर्दी असते. मध्य रेल्वेतील परळ स्थानकाला जोडणारा हा पादचारी पूल असल्याने प्रवासी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. शुक्रवारी सकाळी परतीच्या पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. यामुळे एलफिन्स्टन रोड स्थानकातील पायºया निसरड्या झाल्या होत्या.
पावसामुळे प्रवासी आडोशासाठी पुलावर उभे राहिले. स्थानकांवरील गर्दी वाढत असतानाच अचानक ‘पूल कोसळला’, ‘शॉटसर्किट झाले’ अशा अफवांचे पेव फुटले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ६ ते ७ फुटांच्या पूलावरून बाहेर जाण्यासाठी प्रत्येक प्रवासी धडपडत होता. यावेळी स्थानकावर एकाचवेळी अप आणि डाऊन दिशेने लोकल आल्यामुळे गर्दीत आणखी भर पडली.
गर्दीमुळे रेटारेटीचा जोर वाढल्याने अनेक प्रवासी पायांखाली तुडवले गेले. या दुर्घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त झाली. रेल्वे प्रशासनाने आणि राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे मुंबईतील रेल्वेचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.

मृतांची नावे
मुकेश मिश्रा, शुभलता शेट्टी, सुजाता शेट्टी, सचिन कदम, मयुरेश हळदणकर, अकुंश जयस्वाल, जोतिबा चव्हाण, सुरेश जयस्वाल, चंद्रभागा इंगळे, तेरेसा फर्नांडिस, रोहित परब, अ‍ॅलेक्स कोरिया, हिलोनी देढिया, चंदन गणेश सिंग, मुश्ताक रईस, तेली, प्रियांका पासरकर, मोहम्मद शकील, श्रद्धा वर्पे, मीना वरुणकर, विजय बहादूर, मसूद अलाम

जखमींची नावे
आकाश परब, अजय कुमार, अनुज कुमार, अखिलेश चौधरी, जितेंद्र, जमालुद्दीन, इस्माइल खान, मोहम्मद शेख, नितेश, नरेश कांबळे, पीयूष ठक्कर, पुलवासी, प्रल्हाद कनोजिया, राहून अमिन, रुपेश, रमेश चौधरी, राकेश कदम, राहुल, श्रीनिवास, समीर फारुख, सूरज गौड, सुदीप तावडे, सुरज पटवा, रितेश राठोड, सागर पाटील, वसिम शेख, सत्येंद्रकुमार कनोजिया, सुनील मिश्रा, विक्रम चौघुले, प्रमोद बागवे, अपर्णा सावंत, आशा पिंपळे, धुनिष्ठा जोशी, महानंदा सावंत, प्रतिभा, प्रज्ञा बागवे, शरयु गावडे, श्रद्धा नागवेकर, सीमा कोरी

टाइमलाइन
सकाळी ९.३० : परतीच्या पावसाची मुंबईत जोरदार हजेरी
९.४५ ते १०.१० : स्थानकांवर गर्दीचे प्रमाण वाढले
१०.३० : रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती
१०.३३ : स्थानिकांचा एल्फिन्स्टन स्टेशन मास्तरला फोन
१०.४५ : स्थानिकांचा मदतीसाठी पुढाकार
११.०० : सर्व पोलिस स्थानकांना अलर्टच्या सूचना
११.३० : एल्फिन्स्टन दुर्घटनेत तीन प्रवासी ठार झाल्याचे वृत्त
११.३२ : रेल्वे पोलीस व सुरक्षा बलाचे अधिकारी घटनास्थळी
११.३८ : केईएम रुग्णालयात तीन मृत्यूंचा दुजोरा
११.४५ : केईएममधून १५ प्रवासी ठार झाल्याची माहिती
११.५० : पालिकेसह शासकीय यंत्रणेचे मदतकार्य
१२.०० : एनडीआरएफचे
पाच जवान घटनास्थळी दाखल
१२.१० : वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांकडून अपघात स्थळाची पाहणी
१२.२५ : केईएममधून
२२ जण ठार झाल्याची माहिती

Web Title: Mumbaikars collapsed in the muddy hills; 22 victims of negligence of the Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.