Join us

मुंबईकरांनी डोळे मिटून पाहिजे ते खायला काही हरकत नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 1:56 AM

गिरगाव चौपाटीवर ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

मुंबई : गिरगाव चौपाटीवर ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे. मुंबईकरांना अतिशय चांगली भेट यानिमित्ताने या ठिकाणी मिळाली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि महापालिका यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत असून, चांगला उपक्रम येथे सुरू करण्यात आला आहे. मुंबईमध्ये क्लीन स्ट्रीट फूड हब सुरू झाल्याने आता मुंबईकरांनी डोळे मिटून चौपाटीवर पाहिजे तेवढे खायला काही हरकत नाही. येथील अन्नपदार्थ सेवन केल्याने आरोग्यास त्रास होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.गिरगाव चौपाटीला ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा मिळाला असून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आमदार मंगल प्रभात लोढा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रवीण दराडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जºहाड, अन्न व औषध प्रशासनातील बृहन्मुंबई विभागाचे सह आयुक्त (अन्न) शैलेश आढाव आदी उपस्थित होते.अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे या वेळी म्हणाल्या की, आठ महिन्यांआधी याचे काम सुरू केले होते. गिरगाव चौपाटीवरील स्ट्रीट फूड स्टॉलवर ५० ते ६० पॉइंटच्या नियमावलीचे पालन करणे अपेक्षित होते. मात्र, स्ट्रीट फूड स्टॉलच्या मालकांनी पाच ते सहा पॉइंटच्या नियमांचे पालन केले होते. यात स्ट्रीट फूड स्टॉलवरील अस्वच्छता, पाण्याची गैरसोय, हात धुण्यासाठी व्यवस्था नव्हती, स्टॉलचे चुकीच्या पद्धतीचे व्यवस्थापन तसेच खाद्य बनविणाऱ्यांची वैद्यकीय चाचणी झाली नव्हती. कित्येक महिने पेस्ट कंट्रोल करण्यात आले नव्हते, अशा खूप साऱ्या नियमांचे पालन होत नव्हते. एफडीएने या सगळ्या गोष्टी स्टॉल मालकांकडून करून घेतल्या. दिल्लीमधून एक समिती आली. त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. ‘क्लीन स्ट्रीट फूड हब’ दर्जाचा कार्यकाळ हा २०२० सालापर्यंत असून दर तीन महिन्यांनी अधिकारी येऊन येथे तपासणी करतील.>जुहू चौपाटीचेही लवकरच उद्घाटनक्लीन स्ट्रीट फूड हबचा दर्जा हा जुहू चौपाटीलासुद्धा मिळाला असून त्याचेही लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. पुण्याच्या सारस बागेवरसुद्धा काम सुरू आहे. तिथे लोकांमध्ये जनजागृतीची गरज आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस