मुंबईकरांनो, कान, डोळ्यांसह श्वसनसंस्थेवर होतोय फटाक्यांचा परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:07 AM2017-10-19T07:07:32+5:302017-10-19T07:07:43+5:30

गेल्या काही वर्षांत दिवाळी या सणाचे नाते प्रकाशापेक्षा फटाक्यांच्या आवाजाशी जोडले गेले आहे. काही क्षणात विरून जाणा-या फटाक्यांच्या आवाजामुळे काही जणांना क्षणिक आनंद मिळत असेलही, पण या फटाक्यांच्या

 Mumbaikars, ears, eyes and breathtaking instances of crackers result! | मुंबईकरांनो, कान, डोळ्यांसह श्वसनसंस्थेवर होतोय फटाक्यांचा परिणाम!

मुंबईकरांनो, कान, डोळ्यांसह श्वसनसंस्थेवर होतोय फटाक्यांचा परिणाम!

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांत दिवाळी या सणाचे नाते प्रकाशापेक्षा फटाक्यांच्या आवाजाशी जोडले गेले आहे. काही क्षणात विरून जाणा-या फटाक्यांच्या आवाजामुळे काही जणांना क्षणिक आनंद मिळत असेलही, पण या फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना आयुष्यभर सहन करावे लागतात. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण होते, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण यासोबतच हे फटाके आपल्यावर अनेक अंगांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करत असतात. महापालिकेच्या पर्यावरण खात्याने महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने, फटाक्यांमुळे होणाºया परिणामांचे अभ्यासात्मक संकलन तयार केले.
‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ यांच्या एका अभ्यास अहवालानुसार, दिवाळीदरम्यान वायुप्रदूषणाचे प्रमाण हे सात ते आठ पटीने वाढल्याचे दिसून आले. या प्रकारच्या प्रदूषणाचा प्रतिकूल परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, श्वसन विकाराचे रुग्ण, हृदयरुग्ण आदींवर या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होतो. ‘पर्यावरण संरक्षण कायदा १९८६’ आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ मध्ये असणाºया विविध तरतुदींनुसार फटाक्यांच्या खोक्यांवर फटाक्यांतील घटक-रसायनांची माहिती, फटाके फोडताना होणाºया आवाजाची पातळी आदी माहिती छापणे बंधनकारक आहे.

काय घ्यावी खबरदारी?
फटाके हे शर्ट, पँट किंवा कपड्याच्या खिशात कधीही ठेवू नयेत, फटाके काचेच्या किंवा धातूच्या भांड्यात ठेवून फोडू नयेत, फटाके फोडून झाल्यावर फटाक्यांच्या अवशेषांवर पाणी टाकावे, जेणेकरून त्यातील ठिणगी किंवा उरलेल्या विस्तवामुळे आग लागणार नाही.
ज्या परिसरात आपण फटाके फोडणार आहोत, तो परिसर फटाके फोडण्यासाठी बंदी असलेले क्षेत्र नाही, याची खातरजमा करून घ्यावी, फटाका नीट फुटला नसेल किंवा अर्धवट जळाला असेल, तर तो पुन्हा फोडण्याचा प्रयत्न करू नये, त्याऐवजी फटाक्यावर पाणी टाकून तो फटाका विझवावा.

अहवालातील
निष्कर्ष

रंगांच्या फटाक्यांमुळे हवेत जड धातू, हवेत तरंगणारे धूलिकण यांमध्ये प्रचंड वाढ होते. त्यामुळे श्वसनाचा त्रास असणाºयांचा मूळ आजार बळावतो.
फटाक्यांमुळे तणाव, थकवा, एकाग्रतेचा अभाव, मळमळ, निद्रानाश, डोकेदुखी, भूक न लागणे, यासारखे इतर परिणामही शरीरावर आणि मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारावर होतात.
फटाक्यांमुळे किंवा फटाका फोडल्यावर उडणाºया ठिणग्यांमुळे डोळ्यांवर अतिशय घातक परिणाम होऊन, कायमचे अथवा काही काळ टिकणारे किंवा तात्कालिक दोष निर्माण होऊ शकतात.
फटाक्यांमुळे डोळ्यांच्या बाहुल्यांना किंवा बाहुल्यांच्या पारदर्शक पडद्यावर ओरखडे येऊ शकतात किंवा पडद्याला कायमची इजा होऊ शकते.
पापण्यांच्या आतील भागास किंवा डोळ्यातील पांढºया भागास म्हणजेच श्वेतमंडलास, डोळ्याच्या भिंगाला आणि बुबुळांना इजा होऊ शकते.
डोळ्यातील दृष्टीसंबंधीच्या मज्जातंतूंना फटाक्यांमुळे इजा होऊ शकते. यामुळे व्यक्तीला कायमचे अंधत्व येऊ शकते.
अल्पकालीन व तीव्र स्वरूपाच्या ध्वनिप्रदूषणामुळे व्यक्तीला काही काळापुरते किंवा कायमचे बहिरेपण येऊ शकते.
फटाक्यांच्या आवाजामुळे कानामध्ये आभासी-आवाज येण्यासारख्या गोष्टी उत्पन्न होऊ शकतात.
तीव्र स्वरूपाचा आवाज अचानक कानावर पडल्यामुळे, कानाच्या आतील भागातील नलिका, कानातील पेशींना सूज येणे, यांसारख्या विकारांना सामोरे जावे लागू शकते.
आवाजामुळे कानाचा पडदा फाटणे, पडद्याला छिद्र पडणे, यासारख्या गंभीर स्वरूपाच्या इजा होऊ शकतात.

फटाक्यांमध्ये अनेक घातक आणि प्रदूषणकारी द्रव्ये/रसायने असतात, ज्यामुळे जमीन, हवा आणि पाणी यावर विपरित परिणाम होतो.
जगातील काही देशांमध्ये फटाक्यांवर संपूर्णत: किंवा आंशिक स्वरूपाची बंदी आहे, तर काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारच्या (उदा. रॉकेट) फटाक्यांवर पूर्ण बंदी आहे.
भारतामध्ये १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असणाºया फटाक्यांवर बंदी आहे.
घोषित शांतता क्षेत्राच्या १०० मीटरच्या परिसरात आवाज करणारे फटाके फोडण्यावर बंदी आहे.
रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके फोडण्यावर बंदी आहे.
फटाक्यांमुळे होणाºया अपघातांचे/आगी लागण्याचे प्रमाण दिवाळीत सर्वाधिक असते.

Web Title:  Mumbaikars, ears, eyes and breathtaking instances of crackers result!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.