मुंबईकरांनाे, हवे ते खा, रात्रभर फिरा, नाईटलाईफ, खाद्य केंद्रांसाठी तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:08 AM2021-02-04T08:08:38+5:302021-02-04T08:09:01+5:30

Mumbai News : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ संकल्पनेला कोविड काळात ‘ब्रेक’ लागला. मात्र, आगामी आर्थिक वर्षात रात्रीच्या वेळी खाऊगल्ल्या तयार करण्याची घोषणा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे.

Mumbaikars, eat what you want, walk all night | मुंबईकरांनाे, हवे ते खा, रात्रभर फिरा, नाईटलाईफ, खाद्य केंद्रांसाठी तरतूद

मुंबईकरांनाे, हवे ते खा, रात्रभर फिरा, नाईटलाईफ, खाद्य केंद्रांसाठी तरतूद

Next

मुंबई  - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ संकल्पनेला कोविड काळात ‘ब्रेक’ लागला. मात्र, आगामी आर्थिक वर्षात रात्रीच्या वेळी खाऊगल्ल्या तयार करण्याची घोषणा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली आहे. लोकप्रिय खाद्यपदार्थांची विक्री करणारे ३०हून अधिक विक्रेते, दुकाने, स्टॉल्स यांच्या समूहांचा समावेश खाद्य केंद्रांमध्ये करण्यात येईल. ही खाद्य केंद्र रात्री ११ ते सकाळी ६ यावेळेत सुरू राहतील.

यासाठी अंदाजे ३,३३१ विक्रेते सामावून घेण्याची क्षमता असलेल्या ६५ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. त्याची एकूण लांबी ११ किलोमीटर आहे. पदपथ, वाहतूक बेट, उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागा आणि भिंतीचे सुशोभिकरण आणि रस्त्यावरील खाद्य केंद्रासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद आगामी आर्थिक वर्षात महापालिकेने केली आहे.

मराठी रंगभूमी कलादालन
राज्य सरकारने गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राचा मराठी रंगभूमी कलादालन म्हणून पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पुनर्विकासाच्या कामासाठी १७५ कोटी खर्च अपेक्षित आहे. ताे राज्य सरकार करेल. राज्य सरकारकडून यासाठी पालिकेला निधी उपलब्ध होणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट झाले.

वरळीला मत्स्यालय
वरळी डेअरीतील जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय आणि सागरी संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भूखंड आणि निधी दिला जाणार आहे.

Web Title: Mumbaikars, eat what you want, walk all night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.