- मनोहर कुंभेजकरमुंबई - आरामदायी गारेगार गार प्रवास,वेळेत आणि खर्चात बचत अशी मेट्रो प्रवासाची खासियत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत चक्क मुंबईकर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या प्रेमातच पडले. पंतप्रधानांनी उद्घाटन केल्यानंतर एका आठवड्यातच मेट्रो २ अ आणि ७ ने १० लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास केला. तर दि,२ एप्रिल २०२२ रोजी पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यापासून, मेट्रो २ अ आणि ७ ने आतापर्यंत जवळपास १ कोटींहून अधिक मुंबईकरांना अखंड सेवा देण्यात यश मिळवले आहे. आजपर्यंत जवळपास १,००,०३,२७० इतक्या प्रवाशांनी प्रवास केला.
मेट्रो मार्ग २अ आणि ७ या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाल्या असून मेट्रो मार्ग १ सोबत जोडल्या गेल्या आहेत, यामुळे मुंबई महानगर प्रदेशात पहिले मेट्रो नेटवर्क तयार झाले आहे. या दोन्ही मेट्रो मार्गिका, मेट्रो १ च्या माध्यमातून रेल्वे मार्गाशी सहज जोडले गेल्याने लाखो मुंबईकरांना त्याचा मोठा लाभ झाला आहे. एमएमआरडीएचे आयुक्त एस.आर.व्ही.श्रीनिवासन यांनी आज पत्रकारांना याची माहिती दिली. येत्या काही दिवसात मुंबईकरांचा २५ टक्के अजून प्रतिसाद वाढेल आणि मुंबईकर या सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि,१९ जानेवारी रोजी मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम( डी. एन.नगर) या मेट्रोच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण केले. दि,२० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता या मार्गावर प्रवाश्यांसाठी मेट्रो सुरू झाली. मेट्रो मार्ग २ अ आणि मेट्रो ७ ने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्या संदर्भात प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी आज पत्रकारांना या शुभ वर्तमानाची माहिती देतांना प्रथम गोरेगाव मेट्रो स्थानकावर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी गोरेगाव ते गुंदवली असा पत्रकारां समवेत मेट्रो प्रवास केला.
पहिल्या टप्प्यात कार्यान्वित झाल्या पासून मेट्रो २अ आणि ७ ने पार केला १ कोटी प्रवासी टप्पा गुढीपाडव्याला दि,२ एप्रिल २०२२ रोजी पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यापासून, मेट्रो २ अ आणि ७ ने आतापर्यंत जवळपास १ कोटींहून अधिक मुंबईकरांना अखंड सेवा देण्यात यश मिळवले आहे. आजपर्यंत जवळपास १,००,०३,२७० इतक्या प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर एकूण २२ ट्रेन दररोज २४५ मेट्रो सेवा पुरवत आहेत.
गेल्या सात दिवसात पश्चिम उपनगरात पूर्वेकडील पश्चिम दुर्तगती महामार्गाच्या मेट्रो स्थानकांपेक्षा पश्चिमेकडील लिंक रोड मार्गे जाणाऱ्या मेट्रोला प्रवाश्यांची जास्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.मेट्रोला प्रवाश्यांचा मिळालेला प्रतिसाद बघता,मुंबईकर खाजगी वाहतुकीपेक्षा मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या मेट्रो प्रवासाला जास्त पसंती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम( डी. एन.नगर) या मार्गावर १९ मेट्रो गाड्या धावत होत्या.काल पासून यामध्ये वाढ करून आता २० मेट्रो गाड्या धावू लागल्या आहेत.परिणामी पूर्वी मेट्रोच्या दोन फेऱ्यांच्या मध्ये पूर्वीची असेलेली आठ मिनिटे २० सेकंद असलेले आता सात मिनीटे ५० सेकंद लागतील अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईकर खाजगी वाहनांकडून पर्यावरणपूरक मेट्रोकडे वळत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
२० हजाराहून अधिक प्रवाश्यांना जारी केले मुंबई १ कार्डअखंड प्रवासाला चालना देण्यासाठी आजपर्यंत एकूण २० हजर पेक्षा अधिक मुंबई १ कार्ड जारी केले आहे. मुंबई १ कार्ड हे तुम्हाला प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या सर्व गरजांसाठी एक सामान्य मोबिलिटी कार्ड आहे. मुंबई-१ कार्ड प्रवाशांना अखंडपणे प्रवास करण्यास मदत करत असल्याने हे कार्ड प्रवाशांसाठी अधिक सोयीचे होत आहे. हे कार्ड भारतातील सर्व महानगरांमध्ये आणि मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी वापरले जाऊ शकते. या कार्डचा वापर करून शॉपिंग सोबत तसेच मेट्रो, बेस्ट बसची तिकिटे इत्यादी खरेदी करू शकतात. मेट्रोच्या तिकीट खिडक्यांवर हे कार्ड उपलब्ध आहेत. मुंबई -१ कार्ड प्रत्येक सहलीवर ५-१०% सूट देते.तसेच सोमवार ते शनिवार - ५%, रविवार -१०% आणि राष्ट्रीय सुट्ट्या - १०% यामुळे खर्चात बचत होते. सदर कार्ड लाँच करणारे हे देशातील पाहिले बहुउद्देशीय कार्ड असून त्यासाठी एमएमआरडीएला अकरा महिने लागले. आतापर्यंत गेल्या सात दिवसात वीस हजार प्रवाश्यांनी सदर मुंबई १ कार्ड विकत घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
७५ हजाराहून अधिक लोकांनी केले मेट्रो १ ॲप केले डाउनलोडमुंबई १ कार्डप्रमाणेच ७५७३९ वापरकर्त्यांनी (६१७४२ Android आणि १३९९७ IOS) मुंबई-१ मोबाइल ऍप्लिकेशन त्यांच्या डिव्हाइसवर डाउनलोड केले आहे. या ऍप्लिकेशनद्वारे प्रवासी त्यांच्या ठराविक अंतराच्या तिकिटांसाठी क्यूआर कोड तयार करू शकतात.
मुंबई १ कार्ड आणि ॲप हे मुंबईकरांच्या अखंड प्रवासासाठी एक प्रगत पाऊल आहे. आता मेट्रो रेल्वे हे केवळ वाहतुकीचे साधन राहिले नसून ती एक नवी जीवनवहिनी बनली आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..