मुंबई : महानगरपालिकेच्या ई विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याकरिता नवानगर, डॉकयार्ड रोड येथे असलेली जुनी १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बंद करून या ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी.च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार, १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते गुरुवार, १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.दरम्यान ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. शिवाय जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या काळात पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि १७ व १८ जानेवारी रोजी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
ए विभाग नेव्हल डॉकयार्ड सप्लाय - सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत.
ई विभागनेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) - ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) म्हातारपाखाडी रोड झोन - म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण. डॉकयार्ड रोड झोन
हातीबाग मार्ग जे. जे. रुग्णालय मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन रे रोड झोन - बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३