मुंबईकरांची आर्थिक गाडी आजपासून येणार पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:47 AM2020-06-05T05:47:11+5:302020-06-05T05:47:23+5:30

दुकाने, मंडया सुरू : फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळणे बंधनकारक

Mumbaikars' financial vehicle will return to its former position from today | मुंबईकरांची आर्थिक गाडी आजपासून येणार पूर्वपदावर

मुंबईकरांची आर्थिक गाडी आजपासून येणार पूर्वपदावर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाउन टप्प्याटप्प्याने खुले करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारपासून सर्व दुकाने, मंडया सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाल्यापासून गेले अडीच महिने सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आता मुंबईची आर्थिक गाडी आजपासून पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. मात्र त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.
कोरोना नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त इकबालसिंह चहल
यांनी परिपत्रक काढून मुंबईला पूर्वपदावर आणण्याची तयारी सुरू केली आहे.
मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात बुधवारपासून घराजवळच्या मोकळ्या मैदानात सायकल चालवणे, जॉगिंग करणे, त्याचबरोबर प्लंबर, इलेक्ट्रिशियनना आपली सेवा पुरविण्याची परवानगी काही अटी घालून देण्यात आली आहे. तर दुसºया टप्प्यात मुंबईतील प्रत्येक रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी खुली राहतील तर डाव्या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उघडली जाणार आहेत. मात्र दुकानात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे.
गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना टोकन देणे, मार्किंग करणे, असे नियम पाळावे लागणार आहेत. मात्र नियम मोडल्यास दुकाने तत्काळ बंद करण्यात येतील, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

जबाबदारी सहायक आयुक्तांच्या खांद्यावर
च्रविवारी सर्व दुकाने बंद राहतील. ट्रायल, रिटर्न आणि एक्सेंजवर बंदी असेल. अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहतील. दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.
च्नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित वॉर्डच्या सहायक आयुक्तांवर तसेच दुकानदारांवर असेल.

Web Title: Mumbaikars' financial vehicle will return to its former position from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.