मुंबई : मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये होत आहे. वेकफिट कंपनीने देशातील झोपेसंबंधी माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजेअपुऱ्या झोपेमुळे मुंबईकरांच्या कामावरदेखील विपरीत परिणाम होत असून, कामावर झोप येत असल्याचे बहुतेकांनी सर्वेक्षणात मान्य केलेआहे.आश्चर्याची बाब म्हणजे सर्वेक्षणात तब्बल ७९ टक्के मुंबईकरांनी आठवड्यातून तीनवेळा कामावर झोप येत असल्याची कबुली दिली आहे. तर आठवड्यातून पाचवेळा झोप येणाºयांचे प्रमाण ६ टक्के असल्याचे सर्वेक्षणात दिसले. अपुºया झोपेमुळे सुमारे १५ टक्के मुंबईकरांनी कामाच्या वेळी रोज झोप येत असल्याची माहिती दिली आहे. सततच्या अपुºया झोपेमुळे मन आणि शरीरावर परिणाम होतात. आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रास होतो. या सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने समोर आली आहे.अपुºया झोपेमुळे ५३ टक्के लोकांना पाठदुखीच्या, तर १८ टक्के लोकांना निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे. आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १० ते १०.३० ही झोपण्याची नियमित वेळ असावी, असा सल्ला दिला जातो. पण या वेळेत झोपी जाणाºयांचे प्रमाण केवळ २८ टक्के इतकेच आहे. रात्री उशिरा झोपल्यामुळे आपण उशिरा आणि थकलेले उठतो, असे मत २० टक्के लोकांनी व्यक्त केले असून, ते सकाळी ८ नंतर जागे होतात. सुमारे एक तृतीयांश म्हणजे ३१ टक्के लोकांना ७ तासांपेक्षा कमी झोप मिळते, तर १८ वर्षे वयाखालील २७ टक्के लोकांना फक्त ६ तासांची झोप मिळते. तब्बल १७ टक्के लोक मध्यरात्रीनंतर झोपतात आणि ४० टक्के लोक रात्री ११ नंतर झोपतात. ही त्यांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक गोष्ट आहे.अपुºया झोपेसकारण की...!मुंबईकरांना रात्रभर जागवणाºया गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणारी व्यासपीठे खºया अर्थाने कारणीभूत ठरत आहेत. झोपेला आपल्या डोळ्यांपासून दूर ठेवण्यासाठी ही साधने जबाबदार असल्याचे सर्वेक्षणात कळते. सर्वेक्षणानुसार, सुमारे २४ टक्के लोक मोबाइल फोन, टीव्हीवरील कार्यक्रम व वेब सीरीज पाहण्यासाठी जागे राहतात. तर १५ टक्के लोक अगदी पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपवर काम करतात. सोशल मीडिया सातत्याने तपासत राहणाºयांची संख्या २१ टक्के इतकी आहे. तर भविष्याच्या चिंतेने सुमारे २२ टक्के लोकांची झोप उडाल्याचेही सर्वेक्षणात समोर आले आहे.जितका विकास,तितक्या समस्या!या सर्वेक्षणातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जितका जास्त विकास, तितक्या अधिक भारतीयांना निद्रानाश, असंतुलित झोप आणि पाठीच्या समस्या भेडसावत असल्याचे वेकफिटचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग यांनी सांगितले. एक देश म्हणून आपण दररोज प्रचंड थकलेल्या अवस्थेत का जागे होतो? याचे पुरावे यातून समोर आले आहेत.विवाहित अधिक!सुरुवातीला हे सर्वेक्षण विविध प्रकारच्या लोकांवर करण्यात आले आहे. यातील ७१ टक्के लोक विवाहित आहेत, २६ टक्के लोक अविवाहित असून, ३ टक्के लोक प्रेमात पडलेले आहेत. बंगळुरू, दिल्ली, गुरूग्राम, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या सात महानगरांमधील लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. त्यातील ८१ टक्के लोक हे २५ ते ४४ वर्षे वयोगटातील आहेत.
मुंबईकरांना मिळेना पुरेशी झोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 2:05 AM