मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच पडा घराबाहेर! रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 06:44 AM2023-05-13T06:44:59+5:302023-05-13T06:45:29+5:30
विविध कामे करण्यासाठी रविवारी, १४ मे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : विविध कामे करण्यासाठी रविवारी, १४ मे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसमटी-पनवेलवर शेवटची लोकल रात्री १२.१३ वाजता
नागपूरचा पारा ४२ अंशावर! अकाेला सर्वाधिक ४४.५ डिग्री ,रात्रीची घसरण कायम
हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकात पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवार, १३ मे रोजी रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या काळात डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची पनवेल लोकल सीएसएमटी स्थानकातून रात्री १२ वाजून १३ मिनिटांनी धावणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा- ठाणे अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. कल्याण येथून अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगाच्या दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : वसई रोड ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर
कधी : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : ११. ०५ ते सायं. ४.०५ पर्यंत