मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या! जीवनातील नवीन बदल अवलंब करायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 06:20 AM2020-09-14T06:20:14+5:302020-09-14T06:20:41+5:30

जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे म्हणत मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या, असेही आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Mumbaikars; Go shopping, be careful! New changes in life must be adopted | मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या! जीवनातील नवीन बदल अवलंब करायला हवा

मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या! जीवनातील नवीन बदल अवलंब करायला हवा

Next

मुंबई : कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले असून, मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे.
जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे म्हणत मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या, असेही आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

हे करा
एकदाच वापरात येणारे मास्क (सिंगल यूज मास्क) वापरून झाल्यानंतर ते टाकून देण्यापूर्वी, त्यावर निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) शिंपडून, त्यांचे तुकडे करून नंतर टाकावेत. जेणेकरून त्यांचा पुन्हा वापर करण्यासाठी गैरउपयोग केला जाणार नाही.
कुटुंबातील सदस्यांनी शक्यतो वेगवेगळ्या स्वरूपाचे/ मास्क वापरावेत किंवा स्वत:च्या मास्कला वेगळी खूण करावी. जेणेकरून प्रत्येकाचा मास्क ओळखला जाईल. एकमेकांचे मास्क वापरू नयेत.
सोसायटीत दरवाजाचा कडीकोयंडा, कठडे (हॅण्ड रेलिंग), लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्यतो टाळावे.

प्र्रवास करताना...
सहप्रवाशांशी विनाकारण बोलू नये.
मास्कसमवेत फेसशिल्डचाही उपयोग केल्यास उत्तम.
सार्वजनिक वाहनात एका आसनावर एकाच व्यक्तीने आसनस्थ व्हावे.
दाटीवाटीने प्रवास करू नये. असा प्रवास टाळणे उत्तम.
वाहनांमध्ये दरवाजा, कठडा यांना शक्यतो स्पर्श करू नये.
स्पर्श करावा लागणार असल्यास व वाहनातून उतरल्यानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे.
दुचाकी/चारचाकी वाहनाचा उपयोग प्रवासाच्या गरजेनुसार करावा. तेच फायद्याचे आहे़

बाजारात जाताय; हे करा...
- बाजारपेठेत खरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जाणे, तसेच कमी गर्दीच्या वेळी जाणे.
- दुकानांबाहेर तसेच आतमध्येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल, याची काळजी घ्यावी.
- गर्दी असल्यास तिथे प्रवेश करू नये. जिन्यांचा वापर करावा. कठड्यांना स्पर्श करू नये.
- खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.
- खरेदीसाठी प्राधान्याने आॅनलाइन पद्धतींचा वापर करणे.
- खरेदी करून आणलेल्या वस्तू काही काळ घराबाहेर / मोकळ्या जागेत / जिथे कोणाचाही स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यात.
- दुकाने/मंडया/संकुल येथे सुरक्षित अंतराच्या खुणा करून मर्यादित ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा.
- दुकानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी शारीरिक तापमान, सॅनिटायझर यांची व्यवस्था करावी.
- दुकाने/मंडया/संकुल येथे मर्यादित संख्येनेच नोकर/मदतनीस यांची नियुक्ती करावी.

Web Title: Mumbaikars; Go shopping, be careful! New changes in life must be adopted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.