मुंबईकरांनी केली सोन्याची लयलूट; डिजेवर थिरकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 05:17 AM2016-10-12T05:17:47+5:302016-10-12T05:17:47+5:30

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची लयलूट करत अंबेमातेच्या भक्तांनी मंगळवारी माउलीला निरोप दिला. डीजे, ढोल-ताशे आणि नाशिकबाजाच्या तालावर बेभान होत तरुणाईने माउलीची विसर्जन मिरवणूक

Mumbaikar's gold sale; Digger threw away | मुंबईकरांनी केली सोन्याची लयलूट; डिजेवर थिरकले

मुंबईकरांनी केली सोन्याची लयलूट; डिजेवर थिरकले

Next

मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची लयलूट करत अंबेमातेच्या भक्तांनी मंगळवारी माउलीला निरोप दिला. डीजे, ढोल-ताशे आणि नाशिकबाजाच्या तालावर बेभान होत तरुणाईने माउलीची विसर्जन मिरवणूक गाजवली.
मुंबईसह उपनगरांतील बहुतेक मार्गांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकांसाठी वळविण्यात आली होती. ‘बेबी ब्रिंग इट आॅन’, ‘झिंगाट’ आणि उडत्या गाण्यांच्या तालावर मुंबईकर थिरकताना दिसले. पोलिसांच्या नियोजनानंतरही दादर, गिरगाव, जुहू या चौपाट्यांच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसले. दुपारपासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. (प्रतिनिधी)


आजही होणार विसर्जन-
बहुतांश सार्वजनिक नवरात्र मंडळांनी मंगळवारी माउलीचे विसर्जन केले असले, तरी काही मंडळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जनाला पसंती देतात. त्यामुळे बुधवारीही मोठ्या प्रमाणात माउलीच्या विसर्जन मिरवणुका निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर गर्दी आणि वाहतूककोंडी होण्याची दाट शक्यता आहे.


विसर्जन मिरवणुकीत लुटले सोने-
भायखळा पूर्वेकडील धाकु प्रभूजी वाडीतील डी पी वाडीची माउली मंडळाने अनोख्या पद्धतीने दसरा साजरा केला. माउलीची विसर्जन मिरवणूक येथील फेरबंदर परिसरात पोहोचल्यानंतर मंडळाने सोने लुटण्याचा कार्यक्रम जाहीर केला. चकित झालेल्या भक्तांनीही मोठ्या आनंदात एकमेकांना आलिंगन देत सोने लुटले. मिरवणुकीमुळे घरच्यांसोबत सोने लुटण्याचा आनंद मिळत नसल्याने कार्यकर्त्यांनी एकमेकांसोबत सोने लुटल्याचे मंडळाचे चेअरमन अशोक विचारे यांनी सांगितले.
च्मुंबई उपनगराने गरब्यामध्ये आपली छाप सोडली होती. तर गिरगावापासून गिरणगावामधील विसर्जन मिरवणुकांनी विसर्जनाला ‘चार चाँद’ लावले. गरब्याच्या तालासह डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या भक्तांनी वातावरण ढवळून काढले. नवरात्री जागवल्यानंतर दहाव्या दिवशी माउलीला निरोप देण्यासाठी ज्येष्ठांनीही ठरावीक गाण्यांवर ताल धरला होता.


सोशल मीडियावर नेटिझन्सने लुटले सोने!
आश्विन शुद्ध दशमी हा दिवस ‘विजयादशमी’ किंवा ‘दसरा’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने दिली जातात. या दिवशी सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजन केले जाते.
गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावरून शुभेच्छा देण्याचा ट्रेंड आहे. मंगळवारीही दिवसभर दसऱ्याच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर आणि फेसबुकवर शुभेच्छांचा पूर दिसून आला.
सध्याच्या काळात तरुण पिढी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. स्मार्टफोन, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाकडे तरुण पिढी आकर्षित झालेली आहे. याच सोशल मीडियावर कुठलाही सण, वाढदिवस, एखादी चांगली घडामोड झाल्यास शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतो. तशाच प्रकारे दसऱ्याचेही मेसेजेस सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.

Web Title: Mumbaikar's gold sale; Digger threw away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.