Join us

मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 7:11 AM

दिलासा; तलाव क्षेत्रात तब्बल १२ हजार दशलक्ष लीटर वाढला जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. तलाव क्षेत्रात तब्बल १२ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा होईल एवढा जलसाठा आता तलावांमध्ये आहे.जुलै अखेरीस तलाव क्षेत्रात केवळ ३४ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने महापालिकेने ५ आॅगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू केली. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने मुंबईसह तलाव क्षेत्रात चांगलाच जोर धरला. सर्व तलाव काठोकाठ भरल्यामुळे पालिका प्रशासनाने आॅगस्टअखेरीस २० टक्के पाणीकपात मागे घेतली.वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तलाव क्षेत्रात १४ लाख ३० हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला. आतापर्यंत तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहिले. तर अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा काठोकाठ भरले.जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)तलाव कमाल किमान उपयुक्त साठा सध्या(दशलक्ष)मोडक सागर १६३.१५ १४३.२६ १२८९१० १६३.१४तानसा १२८.६३ ११८.८७ १४३२९९ १२८.५४विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.५८तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.५२अप्पर ६०३.५१ ५९७.०२ २२५११९ ६०३.४५वैतरणाभातसा १४२.०७ १०४.९० ७०७९८३ १४१.७४मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १८९०९६ २८४.१५२३ सप्टेंबररोजी तलावांमध्येजलसाठावर्ष जलसाठा टक्के(दशलक्षलीटर)२०२० १४३०१५२ ९८.८१२०१९ १४२६९९५ ९८.५९२०१८ १३५४८१० ९३.६१

टॅग्स :पाऊसपाणी