Join us  

मुंबईकरांचे हात नाकावर, तर महापालिकेचे कानावर! ५० ते १०० टक्के पदे रिक्त; कचऱ्याची विल्हेवाट लागणार कशी?

By सीमा महांगडे | Published: May 19, 2023 3:04 PM

एकीकडे मुंबईच्या रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगर वाढले असताना मुंबईकरांचे हात नाकावर, तर पालिकेचे कानावर असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे. 

सीमा महांगडे -

मुंबई : कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागत नाही, आमच्या विभागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, अशा अनेक तक्रारी विविध ठिकाणांहून येत असताना घनकचरा व्यवस्थापन विभागातील रिक्त पदांमुळे मुंबईचा कचरा पेटण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये प्रमुख अभियंत्याची जागा १०० टक्के रिक्त असून, कनिष्ठ अभियंत्याच्या ५० टक्के जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष २०२० ते २०२२ दरम्यान सहायक कार्यकारी अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या ३५ टक्क्यांहून ७६ टक्क्यांपर्यत वाढली आहे.  एकीकडे मुंबईच्या रस्त्यांवर कचऱ्याचे डोंगर वाढले असताना मुंबईकरांचे हात नाकावर, तर पालिकेचे कानावर असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे. 

अभियंत्यांच्या विविध पातळ्यांवरील जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत. त्यातच नगरसेवकच नसल्यामुळे कुणी या समस्येकडे गांभीर्याने पाहतही नसल्याची टीका होत आहे. एकीकडे या विभागातील कचरा व्यवस्थापनाचा, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणवाढीचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापन विभागातील विविध कामांवर देखरेख करण्यासाठी या विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

मुंबई पालिकेत अनेक वर्षे विविध विभागातील पदे रिक्त असून, ती भरली जात नाहीत. त्याचा परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांवरही होत असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने ही पदे भरण्याचे आश्वासन दिले असले, तरीही त्याची पूर्तता होत नसल्याचा आक्षेप कामगार संघटनांचा आहे. 

सध्या रिक्त असलेली पदे केव्हा भरली जाणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, कंत्राटीकरणावर भर दिला जात असल्याने कायमस्वरूपी पदांच्या भरतीकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आक्षेप घेतला जात आहे.

-    सर्वाधिक रिक्त पदे घनकचरा व्यवस्थापन विभागात उपद्रव शोधकांची असून, या रिक्त पदांची टक्केवारी जवळपास ९६ टक्के आहे.  

-    शहरात स्वच्छता राखण्याचे महत्त्वाचे काम हे उपद्रव शोधक या पदावर कार्यरत असल्याचे पालिकेच्या २००६ च्या अधिनियमात म्हटले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागातील ही रिक्त पदे भरणे किती आणि का महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते. 

रिक्त पदांची टक्केवारी७५% प्रमुख अभियंते आणि कनिष्ठ अभियंत्याप्रमाणेच घनकचरा व्यवस्थापन विभागात उपमुख्य पर्यवेक्षकांच्या रिक्त पदांच्या जागेची टक्केवारी ७५ टक्के इतकी आहे. ४६% लिपिक, पर्यवेक्षक आणि तंत्रज्ञ५४% इलेक्ट्रिशियन४१% मेकॅनिकल

शून्य कचरा ध्येयासाठी नियमावलीत बदल आवश्यक -प्रजा फाउंडेशनने मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील या रिक्त पदांचा तपशील समोर आणून या विभागातील व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि हवा व पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले आहे. मुंबई शहराला वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्रोत अशा गंभीर समस्या वेगाने होणाऱ्या हवामान बदलामुळे तसेच अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमुळे भेडसावत आहेत.त्यामुळे पालिकेला शून्य कचरा ध्येय गाठण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियमावली २००६ मध्ये २०१६ प्रमाणे नियमानुसार बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे रिक्त पदे लवकर भरली गेली तरच या नियमावलीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होऊ शकेल असे मत मांडले आहे.

माहिती गोळा करण्यासाठी रचना नाहीघनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाटीसाठी कचरानिर्मितीची नियमित माहिती गोळा करण्यासाठी कोणतीही रचना नाही. त्यामुळे अनेक विभागांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची माहिती विसंगत आहे. कचरा निर्माण करणाऱ्यांनी त्यांचा कचरा बायोडिग्रेडेबल, नॉनबायोडिग्रेडेबल आणि घातक कचरा, अशा तीन श्रेणींमध्ये विभागला पाहिजे. 

काही प्रशासकीय पदे -पदे                        २०२०    २०२१    २०२२ सहायक कार्यकारी संचालक    ३५%    ६२%    ७६% उपमुख्य पर्यवेक्षक            ०%        ५०%        ७५%     विशेष उपमुख्य कार्य अधिकारी    १००%    १००%    १००% लिपिक                    ३८%        ३९%        ४६%उपद्रव शोधक                ९४%    ९५%    ९६%पर्यवेक्षक                    ३७%    ४६%    ५४% 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबईकचरा प्रश्न