मुंबईकरांनो, पुढचा मे महिना कसाबसा निघणार ...! ७ धरणात ९० टक्के पाणीसाठा, पाणीकपातीची शक्यता

By सीमा महांगडे | Published: September 6, 2023 06:34 PM2023-09-06T18:34:08+5:302023-09-06T18:34:43+5:30

Mumbai: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती असली तरी मुंबईकरांवर मात्र पाणीकपातीची टांगती तलवार आहे.

Mumbaikars, how will the next month of May pass...! 7. 90 percent water storage in dam, possibility of water reduction | मुंबईकरांनो, पुढचा मे महिना कसाबसा निघणार ...! ७ धरणात ९० टक्के पाणीसाठा, पाणीकपातीची शक्यता

मुंबईकरांनो, पुढचा मे महिना कसाबसा निघणार ...! ७ धरणात ९० टक्के पाणीसाठा, पाणीकपातीची शक्यता

googlenewsNext

- सीमा महांगडे
मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती असली तरी मुंबईकरांवर मात्र पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मुंबूला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांतील पाणीसाठा सध्यस्थितीत ९०. ३९ टक्के इतका असून ही पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सध्याचा पाणीसाठा हा मुंबईकरांना पुढील मे महिन्यापर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे येत्या १ ऑक्टोबरपर्यंत हे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले नसतील तर पुढच्या वर्षातील पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

यंदा पावसाळ्यामध्ये सुरुवातीलाच मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलैपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. सातही तलावांची पाणी साठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज मुंबईला ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या १३ लाख ८ हजार दशलक्ष २०८ लिटर म्हणजेच ९०.३९ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ९८.१५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाऊस कधी पडणार आणि धरणातील पाणीसाठा कधी वाढतो याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.  
 
ऑक्टोबरमधील जलसाठ्यावर नियोजन
दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती असेल त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असते अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
 
पालिकेची वेट अँड वॉचची स्थिती
पालिका प्रशासनाकडून येत्या १० ते १५ सप्टेंबर दरम्यान या तलावांतील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. दरम्यान पुढील आठवड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने अशी पाणी कपातीसाठी वेट अँड वॉच ची भूमिका पालिकेने स्वीकारली आहे.
 
तलावांची स्थिती
- २० जुलै - तुळशी तलाव पूर्ण भरला होता. सध्या ९९.३९ टक्के जलसाठा उपलब्ध
- २६ जुलै - विहार तलाव भरला होता तो ९९. ४६ टक्के भरलेला आहे.
- २६ जुलै - तानसा तलाव भरला, मात्र आता या तलावात ९७. ८० टक्के जलसाठा उपलब्ध
- २७ जुलै - मोडक सागरही तुंडूब भरला होता. सध्या या तलावात ९३. ३१ टक्के जलसाठा उपलब्ध
- अप्पर वैतरणा - ७८.६१टक्के जलसाठा
- मध्य वैतरणा - ९६. ११ टक्के जलसाठा
- भातसा - ९०. ०७टक्के जलसाठा
 

Web Title: Mumbaikars, how will the next month of May pass...! 7. 90 percent water storage in dam, possibility of water reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.