Join us

महापालिकेच्या ट्विटर हँडलला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:34 AM

मुंबई : मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेला सोशल नेटवर्क साइट्सचा वापर आता जमेची बाजू ...

मुंबई : मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेला सोशल नेटवर्क साइट्सचा वापर आता जमेची बाजू ठरत आहे. पालिकेच्या सर्व २४ विभागांसह ७ खात्यांच्या ‘ट्विटर हँडल’वर मुंबईकरांकडून फोटोसह अपलोड करण्यात आलेल्या तक्रारींवर पालिका त्वरित कार्यवाही करत असून, नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्यावर भर दिला जात आहे.

पालिका क्षेत्रातील नागरिकांना अव्याहतपणे विविध नागरीसेवा सुविधा देण्याची जबाबदारी असणारी पालिका नागरिकांशी संवाद साधण्यातदेखील नेहमीच पुढाकार घेत असते. यासाठी १९१६ सारखा विशेष दूरध्वनी क्रमांक किंवा MCGM 24x7  हे भ्रमणध्वनी आधारित अ‍ॅप आणि महापालिकेचे मुख्य ट्विटर हँडल हे सातत्याने कार्यरत आहेत. सहज संवादाची गरज लक्षात घेऊन व नागरिकांना महापालिकेचे टिष्ट्वटर हँडल शोधणे सोपे व्हावे, यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य ट्विटर हँडलचे @mybmc सुटसुटीत नामांतर करण्यात आले असून, टिष्ट्वटर अकाउंटचेही नाव माझी Mumbai, आपली इटउ असे करण्यात आले आहे.

महापालिकेशी संबंधित विविध बाबींची अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी, तसेच सूचना व तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांनी महापालिकेचे ट्विटर हँडल फॉलो करावे, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

मुख्य ट्विटर हँडल व्यतिरिक्त महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांचे स्वतंत्र २४ ट्विटर हँडल कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या, पूल, रस्ते, उद्यान, जल अभियंता व आरोग्य या महत्त्वाच्या ७ खात्यांचीही ट्विटर हँडल सुरू करण्यात आली आहेत.