मुंबई : मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपनगरी रेल्वे सेवा, बेस्ट, मेट्रो व मोनो या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्यात येतील. ही सेवा प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर नागरिकांना खासगी वाहने वापरण्याची गरज भासणार नाही व शहरातील वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संत गाडगे महाराज स्थानक ते वडाळा या दरम्यानच्या मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.विलंबामुळे हा प्रकल्प इतिहासजमा झाला होता. मात्र आम्ही तो कार्यान्वित केला. दुसरा टप्पा सेवेत आल्यामुळे मोनोरेल आता खºया अर्थाने लोकोपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तम शहरांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असण्याची गरज असते. एमएमआरडीए मुंबई परिसरातील सुमारे २५० पेक्षा जास्त किमी अंतरावर मेट्रोचे जाळे विणत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे ते म्हणाले.केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांच्या धडाडीचे कौैतुक केले. मोनोरेल हे मुंबईकरांसाठी स्वप्न ठरले होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रत्यक्षात आणले असे गोयल म्हणाले. केंद्रात व महाराष्ट्रात आता कोणतीही बाब अशक्य नसल्याचा दावा त्यांनी केला. मोनोरेल व उपनगरी रेल्वे सेवेला जिथे शक्य आहे त्या ठिकाणी जोडण्यात येर्ईल, अशी घोषणा त्यांनी केली. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी ही मोनोरेल जगातील तिसºया क्रमांकाची मोनोरेल बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अत्याधुनिक व्यवस्थेमुळे नागरिकांना चांगली सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.>नेहमीपेक्षा ३० टक्के वीज वापर कमीसातरस्ताजवळील संत गाडगे महाराज स्थानकात फीत कापून मुख्यमंत्र्यांनी दुसºया टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या प्रवासाबाबत उपस्थितांमध्ये प्रचंड आकर्षण दिसून आले. मुख्यमंत्र्यांसोबत एमएमआरडीएचे अधिकारी, पत्रकार, काही निमंत्रितांचा पहिल्या प्रवासात समावेश होता. सायंकाळी ६.१५ ला मोनोरेलचा प्रवास सुरू झाला व २४ मिनिटांत मोनोरेल वडाळा स्थानकात ६.३९ वाजता पोेहोचली. मोनोरेलच्या विविध स्थानकांमध्ये सौरऊर्जा वापरासाठी पॅनेल बसवण्यात आली असून, त्या माध्यमातून नेहमीपेक्षा ३० टक्के वीज वापर कमी होईल.>सध्या मोनोरेलच्या माध्यमातून महिन्याला ४ ते साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र दुसºया टप्प्यातील प्रकल्पामुळे दर महिन्याला ३० लाख प्रवासी याचा लाभ घेतील. त्यामुळे सध्या होत असलेला तोटा कमी होऊन महसूल वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेने बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस वापराला प्राधान्य देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना केली.>इतक्या वर्षांनंतर का होईना हा प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याचा आनंद आहे. यामुळे रेल्वे सेवेवरील ताण काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा अपयशी ठरल्याने दुसºया टप्प्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे गरजेचे आहे. भविष्यात मोनो व मेट्रोला जोडण्याबाबत सरकारने विचार करावा. - प्रज्ञा साळवी-ढेरे, स्थानिकज्या भागात टॅक्सी, बस सेवा व्यतिरिक्त इतर सेवा उपलब्ध नव्हती अशा ठिकाणांना मोनोने जोडल्याने या भागातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. मात्र या फेऱ्यांची संख्या पुरेशी असणे गरजेचे आहे. तिकीट दर देखील माफक असावा ही अपेक्षा आहे. - इमामुद्दीन खान, स्थानिक
एकात्मिक तिकीट प्रणालीमुळे मुंबईकरांचा प्रवास होईल सुलभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:51 AM