मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होणार! लोकलच्या सेवा वाढणार, नव्या बांधणीच्या प्रशस्त लोकल लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 05:57 IST2025-02-04T05:57:06+5:302025-02-04T05:57:45+5:30

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुसह्य करण्यासाठी नव्या बनावटीच्या गाड्या बनविण्यात येत आहेत.  गाडीत अधिक खेळती हवा राहील, अशी या गाड्यांची रचना आहे.

Mumbaikars' journey will be more bearable! Local services will increase, newly built spacious local trains will be available soon | मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होणार! लोकलच्या सेवा वाढणार, नव्या बांधणीच्या प्रशस्त लोकल लवकरच

मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होणार! लोकलच्या सेवा वाढणार, नव्या बांधणीच्या प्रशस्त लोकल लवकरच

मुंबई : येत्या काळात १० टक्के रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात येणार असून, मुंबईसह राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात २३,७७८ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सांगितले. सध्या सुरू असलेल्या ३ हजार २०० सेवांची संख्या ३,५०० पेक्षा अधिक होणार असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. 

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुसह्य करण्यासाठी नव्या बनावटीच्या गाड्या बनविण्यात येत आहेत.  गाडीत अधिक खेळती हवा राहील, अशी या गाड्यांची रचना आहे. तसेच लोकलच्या सेवांची संख्या वाढविण्यासाठी दोन ट्रेन सोडण्यातील वेळ कमी करण्यासाठी सिग्नलिंग यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या १८० सेकंदाचा हेडवे १५० आणि नंतर १२० सेकंदावर आणण्यात येणार आहे.

महामुंबईतील प्रस्तावित प्रकल्प आणि किंमत (कोटीत)

कुर्ला- सीएसएमटी ५वी-६वी मार्गिका >> ८९१  

मुंबई सेंट्रल- बोरिवली सहावी मार्गिका >> ९१९  

गोरेगाव- बोरिवली हार्बरचा विस्तार >> ८२६ 

बोरिवली-विरार ५वी-६वी मार्गिका >> २१८४  

विरार -  डहाणू ३री - चौथी मार्गिका >> २७८२ 

पनवेल- कर्जत >> २७८२  

ऐरोली- कळवा >> ४७६  

कल्याण - आसनगाव चौथी लाइन >> ४७६  

कल्याण-बदलापूर तिसरी-चौथी लाइन >> १७,०५९ 

कल्याण-कसारा तिसरी लाइन >> १५१०  

नायगाव- जुचंद्र डबल कॉर्ड लाइन >> १७६  

कल्याण पृथक्करण >> ८८६

निलजे-कोपर डबल कॉर्ड लाइन >> ३३८  

एकूण >> १७,१०७ कोटी 

Web Title: Mumbaikars' journey will be more bearable! Local services will increase, newly built spacious local trains will be available soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.