मेट्रो ३ आवडे मुंबईकरांना, आठवडाभरात १ लाख ५५ हजार जणांचा प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:45 PM2024-10-15T12:45:01+5:302024-10-15T12:45:26+5:30
कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी हा १२.६९ किमी लांबीचा मार्ग सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पहिल्या दिवशी या मेट्रोमधून १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
मुंबई : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरून आठवडाभरात १ लाख ५५ हजार जणांनी प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. या मेट्रो मार्गिकेवर हळूहळू प्रवासी संख्या वाढत असून, आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक २५ हजार ७८२ प्रवाशांची नोंद झाली आहे.
कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेवर पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी हा १२.६९ किमी लांबीचा मार्ग सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पहिल्या दिवशी या मेट्रोमधून १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
४ लाख प्रवासी संख्या गाठण्याचे उद्दिष्ट
त्यानंतर, दरदिवशी २० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद होत राहिली.
आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या रविवारी, १३ ऑक्टोबरला २५,७८२ अशी नोंदविण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.
या मेट्रोचे दरदिवशी ४ लाख प्रवासी संख्या गाठण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची अपेक्षा एमएमआरसीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सोमवार ते शनिवार
पहिली गाडी सकाळी ६:३० वाजता सुटेल.
शेवटची गाडी रात्री १०:३० वाजता सुटेल.