सीमा महांगडे मुंबई : लॉकडाऊन काळात देशभरातील जगभरातील लोकांच्या भीती, चिंता आणि तणावाच्या वातावरणात कमालीची वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते जुलैमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान या चिंतेचे प्रमाण ११७ टक्क्यांनी वाढले आहे. भारताच्या महत्त्वाच्या शहरात तणावाचे प्रमाण मुंबईकरांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४८% दिसून आले आहे.बंगळुरू, एनसीआरमध्ये ते ३७% इतके, तर चेन्नईमध्ये २३% इतके असल्याचे समोर आले आहे. युअर दोस्त या संस्थेकडून देशभरातील ८०० हजारांहून अधिक लोकांचे त्यांची नोकरी, सद्यपरिस्थिती, व्यवसाय, लिंग, शहर, ते कोणत्या प्रकारचे समुपदेशन घेत आहेत या साऱ्या निकषांवरून मानसिक आरोग्याचे सर्वेक्षण केले. त्यावरून ५२% लोकांमध्ये ते आपल्या कामाशी संबंधित गोष्टींमध्ये संतुलन करू शकत नसल्याचे समोर आले आहे.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात ५१% भारतीय हे साधारण मानसिक तणावाची स्थिती पार करत होते, तर ३३% लोकांना हा मानसिक तणाव अति झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. जुलैपर्यंत या तणावात ५५ टक्क्यांची वाढ दिसून आली, तर २४% लोकांमध्ये मानसिक तणावाची परिस्थिती सारखीच राहिली आहे. मानसिक तणाव, चिंता, भीती यांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसून आले.५६.९% पुरुषांमध्ये, तर ४३.१% स्त्रियांमध्ये लॉकडाऊनच्या काळातील मानसिक आरोग्याची ही लक्षणे दिसून आली. या सगळ्यांची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ५९% भारतीयांना ते घरातून काम करत असताना आपल्या कामाच्या ठिकाणी आवश्यक ते संतुलन साधू शकत नसल्याने तणावग्रस्त झाल्याचे समोर आले. याच काळात अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परीक्षा होणार की नाही? पुढे ढकलल्या? या सगळ्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे ३३% विद्यार्थी, त्यांचे पालक यामुळे तणाव, भीती यांच्या सावटाखाली असल्याचे दिसून आले. २५% भारतीयांना नोकºया जाण्याची भीती, तसेच पगार कापला जाण्याची भीती सर्वाधिक असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.या तणावामुळे विद्यार्थ्यांची होणारी चिडचिड ५२% वाढली, एकटेपणा ३८%नी वाढला आहे़>नोकरदारामध्ये भीती आणि चिंतेचे प्रमाण ४१%, तर एकटेपणाचे प्रमाण २६%नी वाढले आहे. या दरम्यान या सगळ्याशी दोन हात करण्यासाठी समुपदेशनासोबत विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिकांनी मित्र, आप्तेष्टांशी फोनवर बोलणे, व्यायाम करणे, सोशल मीडियावरील बातम्यांशी कमी संबंध ठेवणे, अशा पयार्यांचा सराव केला आहे़>वयानुरूप तणावाचे प्रमाण२१ - ३० वर्षे ५३.९ %३१- ४० वर्षे २१.३ %१७ - २० वर्षे १५%४१- ५० वर्षे ४.७ %५१- ६० वर्षे ३.६ %६० वर्षे वरील १.५ %>भारतातील या शहरांत तणावाच्या पातळीचे प्रमाण सर्वाधिक दिसून आलेमुंबई ४८%दिल्ली एनसीआर ३७%बंगळुरू ३५%चेन्नई ३२%>व्यवसायनिहाय तणावाचे प्रमाणनोकरदार ५२.३%विद्यार्थी ३६.१ %गृहिणी २.२%बेरोजगार ३.९ %उद्योजक १.७%
लॉकडाऊन काळात मुंबईकर देशात सर्वाधिक ‘स्ट्रेसफुल्ल’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 2:00 AM